मुंबई 31 जानेवारी : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच लोक आपल्या आवडीनिवडी प्रमाणे व्हिडीओ पाहात असतात. यात कधी तुम्हाला मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा चिमुकला डान्स करत आहे. तुम्ही त्याचा डान्स पाहिलात तर तुम्ही खरंच त्याचे फॅन व्हाल. या मुलाने नोरा फतेहीच्या गाण्यावर डान्स केला आहे. हे ही पाहा : Viral : ‘या’ चोराला कुठे शोधायचं पोलिसांना प्रश्न ? CCTV मध्ये चोर तर दिसला पण… नोरा एक अभिनेत्री आणि डान्स आहे, तिने तिच्या डान्सने अनेकांना वेड लावले आहे. तिच्या फॅन्सचं तर असं म्हणणं आहे की नोरा सारखा डान्स कोणीच करु शकत नाही. पण असं असलं तरी देखील एका चिमुकल्याने नोराला खरोखर मागे टाकलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.
या चिमुकल्याने नोराच्या ‘हाय गर्मी’ गाण्यावर डान्स केला आहे. त्याच्या सगळ्याच डान्स स्टेप्स फारच सुंदर आहेत. त्याचा निरागसपणा आणि त्याचा डान्स दोन्ही गोष्टींने नेटकऱ्यांच्या मनात जागा निर्माण केली. या मुलाचा डान्स तुम्ही शेवटपर्यंत पाहा, तो शेवटी अशी नोरा फतेहीची सिग्निचर स्टेप मारतो. ही स्टेप तो इतकी भारी करतो की बस्स… त्याच्या स्टेपने तर तुमचा दिवस नक्कीच बनेल, हा खूपच मनोरंजक व्हिडीओ आहे. जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.