मराठी बातम्या /बातम्या /Viral /भारीच आहे! 35 व्या वर्षी 10 कोटींची सेव्हिंग; महिलेची आयडिया पाहून अवाक् व्हाल!

भारीच आहे! 35 व्या वर्षी 10 कोटींची सेव्हिंग; महिलेची आयडिया पाहून अवाक् व्हाल!

एवढी सेव्हिंग झाल्यावर आता वयाच्या 35 व्या वर्षी या तरुणीने नोकरीतून निवृत्ती घेतली आहे.

एवढी सेव्हिंग झाल्यावर आता वयाच्या 35 व्या वर्षी या तरुणीने नोकरीतून निवृत्ती घेतली आहे.

एवढी सेव्हिंग झाल्यावर आता वयाच्या 35 व्या वर्षी या तरुणीने नोकरीतून निवृत्ती घेतली आहे.

ब्रिटेन, 27 सप्टेंबर : कपड्यांची खरेदी न करता (No Shopping) आणि महागड्या हॉटेलमध्ये (Avoid Going big hotels) जाणं टाळून एका महिलेने 10 कोटी रुपयांची बचत केली आहे. ही कहाणी एका अशा महिलेची आहे जिने दावा केला आहे की, विनाकारण खर्च रोखून तिने 10 कोटी (10 crores Saving) वाचवले आहेत आणि 35 वयात निवृत्त झाली आहे. या महिलेचं नाव केटी डोनेगन असून गेल्या दोन वर्षात केटी आपला पती एलनसह अनेक देशात पर्यटन करीत आहे.

केटी डोनेगनने द सनला दिलेल्या माहितीनुसार, माझी आई एलिसन शिक्षिका आहे आणि वडील क्रिस मार्केट रिसर्चर. आमच्याजवळ सर्वसामान्यांप्रमाणे पैसे होते. मात्र महागडे हॉटेल, फॅन्सी हॉलिडेसाठीचे पैसे नव्हते. मी नेहमीच माझी पॉकेन मनी वाचवत असेल. मी ते पैसे खर्च करण्यापेक्षाही पाहून खूष व्हायचे.

स्वस्त जागेवर खानपान..

केटी डोनेगनने पुढे सांगितलं की, सुरुवातीला तिने 9 पाऊंट प्रति तास (एक पाऊंड म्हणजे तब्बल 100 रुपये) या हिशोबाने काम केलं. यानंतर जागवेरा 2005 मध्ये कोस्टा रिका येथे गेले. या ठिकाणी एलनसोबत भेट झाली. यानंतर ती युकेला परतली आणि अभ्यास सुरू केला. यादरम्यान तिने निष्कारण होणारा खर्च रोखला. नवीन कपडे खरेदी केले नाहीत. स्वस्त रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले आणि कोणाकडूनही कर्ज घेतलं नाही. (Saving and investment)

हे ही वाचा-गुंतवणुकीसाठी व्हा सज्ज! आता ही कंपनी देखील बाजारात IPO आणण्याच्या तयारीत

केटीने पुढे सांगितलं की, 2008 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही एलनच्या आईकडे शिफ्ट झालो. ज्यामुळे आम्हाला घराचं डिपॉजिट द्याव लागलं नाही. सुरुवातीला मला प्रत्येक वर्षाला 28,500 पाऊंडची नोकरी मिळाली. एलन शिक्षण क्षेत्रात होता. आम्ही पॅकेट फूड खात असे. जुनी गाडी चालवत होतो आणि महागडे नाइट आऊटच्या ऐवजी घरीच पार्टी करीत होता. (England 10 crore savings in 35 years Youll be amazed at the womans idea)

वर्षात वाचवले 42 हजार पाऊंड

केटी म्हणते की, तब्बल 2 वर्षात आम्ही 42 हजार पाऊंडची बचत केली. ज्यामुळे आम्ही 167650 पाऊंडच्या दोन बेडरूम फ्लॅटचं डिपॉजिट दिलं.

2013 मध्ये आम्ही लग्न केलं. लग्नासाठी लोकल कम्युनिटी हॉल बुक केला. लोकांना इमेलच्या माध्यमातून आमंत्रण पाठवलं. मित्रांनी सजावट केली आणि कमी खर्चात लग्न केलं.

पुढे ती म्हणते की, 2014 पर्यंत आम्ही प्रत्येक वर्षी 58000 पाऊंड कमवत होतो. पतीची कमाई मिळून 63000 पाऊंड झाले. आम्ही प्रत्येक महिन्याला 3 हजार पाऊंडची बचत केली. 2015 मध्ये मी शेअर मार्केटमध्ये पैसे लावणं सुरू केलं. याचाही फायदा दिसून आला. आमच्याजवळ 291000 पाऊंडची बचत झाली. आम्ही आमचं टार्गेट 1 मिलियनपर्यंत ठेवला होता.

त्यानंतर 2018 मध्ये आम्ही 898000 पाऊंडची बचत केली. आणि गुंतवणूकदेखील केली. मार्च 2018 ते एप्रिल 2019 दरम्यान आम्ही गुंतवणुकीवर 46000 पाऊंडची कमाई केली. आम्ही आमचं एक मिलियनचं टार्गेट पूर्ण केलं. त्यानंतर मी 35 व्या वर्षी कामातून निवृत्ती घेतली.

केटी पुढे सांगते की, ती आपल्या गुंतवणुकीतून प्रत्येक वर्षी 65 हजार पाऊंड कमावत होती. आता केटी डोनेगज आणि तिचा पती एलनने आपली नोकरी सोडली आहे. आणि दोघे विविध देशांमध्ये फिरायला जातात. केटी म्हणते की, आजही ती निष्कारण खर्च करीत नाही, आणि लोकांना पैसे वाचविण्यासंदर्भातील सल्ले मोफत देते.

First published:

Tags: England, Investment, Savings and investments