नवी दिल्ली 29 सप्टेंबर : जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल. यातीलच एक आहे जगातील सर्वात महाग साबण (Most Expensive Soap in World). या छोट्याशा साबणाची किंमत इतकी जास्त आहे, की सामान्य माणूस इतक्या पैशात सोन्याचा हार विकत घेऊ शकतो. विशेष बाब म्हणजे गेल्या बऱ्याच काळापासून एकच कुटुंब याची निर्मिती करत आहे. सोनं आणि हिऱ्यांपासून बनलेल्या (Gold and Diamond Soap) या साबणाची किंमत 2 लाख रुपयाहून अधिक आहे.
लेबनानच्या त्रिपोली येथे हा साबण बनवला जातो. हा साबण बशर हसन अॅण्ड सन्स बनवतात. या साबणाच्या ब्रॅण्डचं नाव आहे द खान अल साबण (The Khan Al Saboun). याची छोटीशी फॅक्ट्री अनेक वर्षांपासून सुरू आहे. या ब्रॅण्डकडून लग्जरी साबण (Luxury Soap) आणि स्किनकेअर प्रोडक्ट (Skincare Product) बनवले जातात. यात शुद्ध वस्तूंचा वापर केला जातो. याच कारणामुळे याची किंमत लाखो रुपये आहे.
अरारारा... खतरनाक! बैलाची भारी करामत; Stunt Video पाहून नेटिझन्स हैराण
या साबणाचे बहुतेक ग्राहक हे यूनायटेड अरब अमीरातच्या दुबई शहरात आहेत. तिथल्या काही दुकानांमध्ये या खास साबणाचा सप्लाय केला जातो. सांगितलं जातं, की सर्वात आधी साल २०१३ मध्ये हा साबण कतरच्या फर्स्ट लेडीला गिफ्ट केला गेला होता. जगातील सर्वात महाग या साबणाच सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या पावडरचा वापर केला जातो. याच कारणामुळे याची किंमत २ लाखाहून अधिक आहे. पाहताना हा साबण चीजच्या तुकड्याप्रमाणे दिसतो.
या साबणाच्या कंपनीचे CEO अमीर हसन (Amir Hasen) यांनी हा साबण बहरीनची एक अभिनेत्री आणि इन्स्टाग्राम सुपरस्टार (Instagram Star) शैला सब्तला गिफ्ट दिला होता. साल २०१५ मध्ये BBC नं या साबणाबाबत सांगितलं होतं, की या महागड्या प्रोडक्टची खासियत ही आहे, की तो सोने आणि हिऱ्यांच्या पावडरनं बनला आहे. साबण बनवणाऱ्या कंपनीचा असा दावा आहे, की या साबणानं अंघोळ करणाऱ्यांवर याचा एक वेगळाच परिणाम होतो.
लॉकडाऊनमुळे चिमुकलीवर झाला गंभीर परिणाम, आता स्वतःचेच केस उपटते अन्...
हा साबण मानसिक आणि अध्यात्मिक परिणामही करतो. या साबणात 17 ग्रॅम सोनं असतं. काही ग्रॅम डायमंड पावडर, थोडे शुद्ध ऑलिव्ह ऑइल, सेंद्रीय मध, खजूर आणि इतर गोष्टी या साबणाला खास बनवतात. हा साबण केवळ विशिष्ट लोकांना जातो का किंवा कोणीही तो ऑर्डर करू शकतं का, हे स्पष्ट नाही. मात्र, एवढे महाग साबण लावणं प्रत्येकाच्याच परवडणारं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Super expensive, Viral news