मुंबई, 22 जून : पानीपुरी कोणाला खायला आवडत नाही? असं म्हणतात की हे मुलींच्या सर्वात आवडत्या खाद्यपदार्थांपैकी आहे. पण असं असलं तरी देखील अशी अनेक मुलं देखील आहेत. ज्यांना पानीपुरी खायला आवडते. देशातील वेगवेगळ्या भागात पानीपुरीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. कुठे पुचका तर कुठे गोलगप्पा या नावाने ती ओळखली जाते. याला नाव काहीही द्या पण ती सर्वांच्याच आवडीची आहे, हे मात्र नक्की. पण यासगळ्यात पानीपुरी संबंधीत एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. कधी पाहिलंय हत्तीला पाणीपूरी खाताना? हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल हा व्हिडीओ पानीपुरी खाणाऱ्या माकडाचा आहे. लहान किंवा मोठ्या माणसांना पानीपुरी खाण्याचा मोह आवरत नाही तर माकडाला तरी तो कसा आवरणार? या ४८ सेकंदांच्या व्हिडीओने, लोकांना वेड लावलं आहे. यामध्ये माकडाला अशा मजेदार पद्धतीने पानीपुरी खाताना पाहून नेटकऱ्यांना खूपच भारी वाटत आहे. हा क्यूट व्हिडीओ नक्कीच तुमचा दिवस बनवेल. मनीमाऊ ऑन मिशन, चिमुकली बाल्कनीजवळ येताच करु लागली अशी गोष्ट, Video पाहून तुम्ही कराल कौतुक नक्की काय घडलं? अचानक माकड कुठून तरी आला आणि पानीपुरीवाल्याच्या शेजारी बसला. आधी पानीपुरीवाल्याने माकडाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याने ताटात काही पानीपुरी घेऊन माकडासमोर ठेवल्या. मग काय…
हातगाडीवर बसून माकड गोलगप्पांचा आस्वाद घेऊ लागले. काही वेळातच पाणीपुरी खाताना माकड पाहण्यासाठी गाडीभोवती लोकांची गर्दी जमली. हा व्हिडिओ 20 जून रोजी ‘अबतक मीडिया’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला होता आणि ही घटना गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथील असल्याचे सांगितले गेले आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर केला जात आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडत आहे.