मुंबई : सोशल मीडियाचं वेड अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे. म्हणून तर कोणालाच्याही हातात फोन आला की लोक त्याला स्क्रोल करु लागतात. रिल्समुळे तर स्क्रोलिंगचा प्रकार वाढला आहे. लोकांना इतक्या मनोरंजक गोष्टी येथे पाहाला मिळतात की त्यांचा तासनतास वेळ कसा वाया जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. पण हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. कारण येथे फोनचं वेड माणसाला नाही तर चक्क माकडाला लागलं आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड बसला आहे, जो फोन स्क्रोल करत बसला आहे.
या माकडाला फोनचं असं काही वेड लागलंय की, तो इकडे तिकडे लक्ष न देता फक्त फोनमध्येच व्यस्त आहे आणि फक्त फोन स्क्रोल करत बसला आहे. हा व्हिडीओ खूप मजेदार आहे.
इस बेचारे को ऐसी ‘इंसानियत’ से बचाओ! pic.twitter.com/BdlH5SeNji (🙏🏽 @jagdishmitra )
— anand mahindra (@anandmahindra) April 7, 2023
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माकड मोबाईलकडे किती प्रेमाने पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या पुढे एक महिला आहे जी पूर्णपणे शांत दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांचं हसू आवरत नाही आहे. Video : जेव्हा हत्ती आणि सिंहिण समोरा-समोर येतात, पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं ही कठीण हा व्हिडीओ देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्याने एक कॅप्शनही शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे- या गरीब माणसाला अशा ‘माणुसकी’पासून वाचवा! व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. त्याचवेळी 5 हजारांहून अधिक लोकांली याला लाईक्स केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा देखील पाऊस पडला आहे.