नवी दिल्ली 19 डिसेंबर : हरियाणाच्या 21 कोटींच्या सुलतान (Sultan) म्हशीला तुम्ही नक्कीच विसरला नसाल. अशात आता पंजाबमधील फाजिल्का येथील आणखी एक म्हैस समोर आली आहे. या म्हशीचं वर्णन जगातील सर्वात सुंदर (Most Beautiful Buffalo in World) आणि सुलतानपेक्षाही अधिक मौल्यवान म्हैस म्हणून केलं जात आहे. या म्हशीचं वैशिष्ठ्य पाहून केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला इतके प्रभावित झाले की त्यांनी तिला सोलन पशु मेळ्याचा कायमस्वरूपी चॅम्पियन घोषित केलं. या म्हशीच्या देखभालीचा वार्षिक खर्च एक कोटी रुपये येतो.
कन्यादान विधीला नाकारत IAS तपस्या परिहारने केलं लग्न, पाहा व्हायरल PHOTOS
म्हशीचे मालक वीरेंद्र सिंह यांनी दावा केला आहे की, या म्हशीने 21 कोटींच्या सुलतानलाही लढाईत पराभूत केलं होतं. यावरून या म्हशीची किंमत सुलतानपेक्षा जास्त असल्याचा अंदाज लावता येतो (Most Expensive Buffalo). 5 फूट 9 इंच उंचीची ही म्हैस दररोज 20 प्रकारचे अन्न खाते. पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, देशात आणि परदेशात एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांची लोकप्रियता पाहून फाजिल्का येथील शेतकरी वीरेंद्र सिंह यांनी त्यांच्या या म्हशीचे नाव मोदी असे ठेवले आहे. त्यानंतर फाजिल्का येथील ही म्हैसही जगप्रसिद्ध झाली.
वीरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, ही म्हैस अवघ्या सहा वर्षांची आहे, पण ती हत्तीशी स्पर्धा करू शकते. या म्हशीची उंची 5.9 फूट असून तिचा स्वतःचा विक्रम आहे, ती कुठेही गेली तरी सर्वांचं लक्ष वेधून घेते आणि नेहमीच पहिली येते. नुकतंच सोलन नौनी विद्यापीठातील प्रदर्शनात ही म्हैस आली, जिथे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेदेखील या म्हशीवर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिला कायमचा चॅम्पियन म्हणून घोषित केलं.
या म्हशीची विशेष काळजी घेतली जाते, असे म्हशीच्या मालकाने सांगितले. सुमारे 20 प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण करून ते म्हशीला दिले जाते. त्यांनी सांगितलं, की म्हशीची आई लक्ष्मी देखील चॅम्पियन होती. आता मोदीही तिच्या पावलावर पाऊल टाकत आहे. आज संपूर्ण पंजाबला आणि त्यांच्या गावाला या म्हशीचा अभिमान आहे.
या म्हशीचं संगोपन आणि चारा यासाठी वर्षाला सुमारे एक कोटी रुपये खर्च केले जातात. 20 प्रकारचे खाद्य पदार्थ मिसळून खायला दिले जातात. ही म्हैस रोज पाच किलोमीटर चालते. आंघोळीनंतर तिला तेलाची मालिश केली जाते.
या म्हशीची आई लक्ष्मी 25 लिटर दूध देते. तिच्या सिमन्सला मोठी मागणी आहे. तिचे सिमन्स विकले जातात, त्या आधारावर त्याची किंमत कोटींमध्ये मोजली जाते. म्हशीला राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमध्ये विशेष आमंत्रित केलं जातं. या म्हशीला छोटा हत्ती असंही म्हटलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Viral news