Home /News /videsh /

'या' मुस्लीम देशात मुलींच्या लग्नाची किमान वयोमर्यादा 16 वर्षे; वाढवण्यास सरकारचा नकार

'या' मुस्लीम देशात मुलींच्या लग्नाची किमान वयोमर्यादा 16 वर्षे; वाढवण्यास सरकारचा नकार

आता भारतात मुलीच्या लग्नाची वयोमर्यादा 21 वर्ष करण्याची तयारी सुरू आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुस्लिम देशाविषयी (Muslim Country) सांगणार आहोत की जिथे मुलींचे लग्नाचे किमान वय 16 वर्ष आहे.

    क्वालालंपूर, मलेशिया, 18 डिसेंबर : यापूर्वी भारतात (India) मुलींचं लग्नाचं (Marriage) किमान वय 18 वर्ष होते. वैद्यकीय दृष्टिकोनातून हे वय योग्य आहे आणि लोकांचाही त्याला आक्षेप नव्हता. वयाच्या 18 व्या वर्षी आई होण्याच्या वेदना सहन करण्यासाठी मुलीचे शरीर तंदुरुस्त बनते. तसेच या वयानंतर मुली समजूतदारही होतात. कौटुंबिक गोष्टींचं नियोजन कसं करावं, हे देखील त्या शिकतात. मात्र आता भारतात ही वयोमर्यादा 21 वर्ष करण्याची तयारी सुरू आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुस्लिम देशाविषयी (Muslim Country) सांगणार आहोत की जिथे मुलींचे लग्नाचे किमान वय 16 वर्ष आहे. आम्ही मलेशिया (Malaysia) या देशाविषयी चर्चा करीत आहोत. इस्लाम (Islam) हा या देशात अधिकृत धर्म मानला जातो. तसेच या देशात मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे या देशाचे कायदेही इस्लामला डोळ्यासमोर ठेवून बनवले गेले आहेत. मलेशियात मुलींचे लग्नाचे किमान वय 16 वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक ही वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारने तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. हे ही वाचा-Shocking Report: दहशतवादासंबंधी अमेरिकेने प्रसिद्ध केला अहवाल, भारताला धोका? मलेशियाचे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री इद्रीस अहमद (Idris Ahmad) यांनी याबाबत सांगितलं की ``मुस्लिम मुलींच्या लग्नाचे किमान वय 16 वरून 18 करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही``. मुलींच्या लग्नासाठी 16 वर्ष वय योग्य आहे, असं त्यांना वाटतं. शासनाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वयोमर्यादा वाढवण्यासाठी सरकारवर अनेक ठिकाणांहून दबाव येत होता. मात्र मुलींच्या लग्नासाठीची किमान वयोमर्यादा 16 वरून 18 केली जाणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. तुमच्या अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या (US State Department) मानवाधिकार 2014 च्या अहवालानुसार, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये मुस्लिम मुलींच्या विवाहासाठी किमान वय 12 वर्ष आहे. मुस्लिम मुले 16 व्या वर्षी लग्न करू शकतात. तर येथे कायदेशीर वयोमर्यादा 18 वर्षे आहे. याशिवाय युरोपातील एस्टोनियामध्ये मुलीचे लग्नाचे किमान वय 15 वर्ष आहे.
    First published:

    पुढील बातम्या