उंदरांच्या बिळात पाणी सोडलं आणि वेगवेगळ्या जातीचे 200 साप आले बाहेर

उंदरांच्या बिळात पाणी सोडलं आणि वेगवेगळ्या जातीचे 200 साप आले बाहेर

मुलांनी खेळता खेळता उंदराच्या बिळात पाणी सोडलं आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक असे 200 हून अधिक साप बाहेर आले. घाबरलेल्या गावकऱ्यांनी सर्व साप ठार केले आणि त्यांना पुरून टाकलं.

  • Share this:

गोरखपूर, 20 मे : एका उंदराच्या बिळात मुलांनी पाणी सोडल्यानंतर त्यातून वेगवेगळ्या जातीचे तब्बल 200 साप बाहेर आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मुलांसह संपूर्ण गावच भीतीच्या छायेखाली वावरत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं ही घटना घडली. आराजी बसडीला गावात 200 पेक्षा जास्त साप एका बिळातून बाहेर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

साप बिळातून बाहेर आल्यानंतर गावकऱ्यांनी भीतीमुळे त्यांना मारून टाकलं. त्यानंतर मृत साप दफन करण्यात आले. गावात बिळातून इतक्या मोठ्या प्रमाणावर साप बाहेर आल्यानंतर वन खात्याचं पथक घटनास्थळी आलं. त्यांनी जमिनीत पुरलेले साप तपासणीसाठी ताब्यात घेतले.

गावातील लोकांनी बिळातून बाहेर आलेले साप पाहताच त्यांना मारून टाकलं. गावात राजमंगल नावाचं एक घर शेतात आहे. ते बऱ्याच काळापासून बंद होते त्यातून साप बाहे आल्याचंही लोकांनी म्हटलं आहे.

हे वाचा : बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO

गावचे सरपंच सुरेंद्र मोहन यांनी सांगितलं की, मुलं त्या ठिकाणी खेळत होते. तेव्हा त्यांनी उंदरांच्या बिळात पाणी घातलं. त्यानंतर एक एक करत लहान मोठे साप बिळातून बाहेर पडू लागले. त्यावेळी घाबरलेल्या गावकऱ्यांनी सापांना ठार केलं.

हे वाचा : कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांनी केला अजब जुगाड, पाहा PHOTO

सापांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंर वन विभागाचे पथक या ठिकाणी आले. त्यांनी मृत सापांचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. आता पुढची कारवाई केली जाणार आहे असंही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे वाचा : जिम कॉर्बेटमध्ये बछड्यांबरोबर मस्ती करताना दिसली 'पारो', PHOTO व्हायरल

First published: May 20, 2020, 12:34 PM IST
Tags: Gorakhpur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading