Home /News /viral /

बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO

बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO

दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या जबड्यातून वाचला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

    हैदराबाद, 16 मे : कोरोनामुळे देशभऱात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनदरम्यान अनेक वन्यजीव आणि जंगली प्राणी देशातील विविध भागांमध्ये रस्त्यावर येत असल्याचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले आहे. मध्यंतरी एका माकडानं घरात घुसून लहान मुलाचं अपहरण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता आणखी एक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ हैदराबादमधून समोर आला आहे. शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं थेट रस्त्यावर असलेल्या माणसावरच हल्ला केला आहे. बिबट्या या तरुणाचा जवळपास फडशा पडण्याच्या तयारीत होताच पण जवळ असलेल्या ट्रक ड्रायव्हरनं या तरुणाला ट्रकमध्ये खेचून घेतलं. त्याच दरम्यान बिबट्या अंगावर रस्त्यावरचे कुत्रे धावून आल्यावर बिबट्याचा निशाणा चुकला. त्यामुळे बिबट्याच्या जबड्यातू तरुणाची सुटका झाली. हे वाचा-लॉकडाऊनमध्ये 900 किलोमीटर जखमी मुलाला खांद्यावरून घरी घेऊन गेले वडील VIDEO लॉकडाऊनमुळे माणसांची रस्त्यावर रहदारी कमी झाली आहे आणि अनेक जंगली प्राणी शिकारीच्या आणि खाण्याच्या शोधात आता रस्त्यांवर किंवा मानवी वस्त्यांमध्ये घुसताना दिसत आहेत. हैदराबाद इथे ह्या बिबट्यानं तरुणावर हल्ला केला. दैव बलवत्तार म्हणून कुत्रांनी या तरुणाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-विशाखापट्टणम गॅस गळतीचा धक्कादायक CCTV VIDEO समोर संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या