जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील ढिकाला पर्यटन झोनमध्ये पारो नावाची एक वाघिण तिच्या बछड्यांबरोबर मस्ती करताना दिसली. सध्या लॉकडाऊनमुळे पार्क बंद असल्यामुळे सर्वच प्राणी मुक्त विहार करताना दिसत आहेत.
जिम कॉर्बेटच्या बिजरानी रेंजमधील खली नावाचा वाघ आणि शर्मिली नावाची वाघिण खूप प्रसिद्ध आहेत. त्यानंतर ढिकाला झोनमध्ये पारो आणि तिचे बछडे पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहेत.
नॅशनल पार्कमधील गाइड आणि याठिकाणी नेहमी येणाऱ्यामध्ये पारोच्या बछड्यांची मस्ती फार प्रसिद्ध आहे. कधी कधी ते एकमेकांचा पाठलाग करताना देखील पाहायला मिळतात.
वन्यजीव प्रेमी मोहम्मद नफीस सांगतात की पारोचे बछडे आता शिकार देखील करू लागले आहेत. अनेक वन्यजीव प्रेमी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. पार्कमध्ये जिप्सी चालवणारे आदिल देखील यांनी देखील या बछड्यांंचे अनेक फोटो काढले आहेत
जिम कॉर्बेटचे संचालक राहुल सांगतात की बछडे आता 15 महिन्यांचे झाले आहेत. ते 2 वर्षांचे झाल्यावर त्यांच्या आईपासून वेगळे होतील.