मुंबई, 19 मे : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. ह्या व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आरोग्यासाठी गरजेचं आहे. आता हे सोशल डिस्टन्सिंग कळत-नकळत मोडलं जाऊ नये म्हणून जगभरात लोक विविध युक्तांचा वापर करत आहेत. कुणी छत्री घेऊन तर कोणी गोलाकार मोठ्या आकाराची टोपी परिधान करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून लोक हा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत. सोशल मीडियावर आणखीन एक भन्नाट आयडिया व्हायरल होत आहेत. जर्मनीतील एका रेस्टॉरंन्टमध्ये सोशल डिस्टन्स बाळगण्यासाठी लोकांनी खास युक्ती सोधून काढली आहे. लोकांनी आपल्या डोक्यावर वेगवेगळ्या आकारतील स्विमिंग पूल नूडल्स लावले आहेत. ज्याद्वारे सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल. रेस्टॉरंटने आपल्या फेसबुक पेजवरुन एक फोटो शेअर केला आहे
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व देशांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणांवर आणि मार्केटमध्ये 3 ते 6 फुटांचं अंतर ठेवण्याचं आवाहन लोकांना करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होऊ नये आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांनी अशी भन्नाट युक्ती शोधली आहे.
रेस्टॉरंटने हा फोटो आपल्या फेसबुक पेजवर रविवारी शेअर केला होता. आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त शेअर्स मिळालेले आहेत. लोक या फोटोवर कमेंट करत आहेत. एका युझरनं तर ही कल्पना खूप क्रिएटीव्ह आणि भन्नाट असल्याचं म्हटलं आहे. तर अनेक युझर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात आतापर्यंत 40 लाखाहून अधिक लोकांना झाला आहे. तर 2,97,000 लोकांचा आतापर्यंत कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे.