मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चक्क माकडांनी फकडवला तिरंगा; ध्वजारोहणाचा हा अनोखा VIDEO पाहून वाटेल अभिमान

चक्क माकडांनी फकडवला तिरंगा; ध्वजारोहणाचा हा अनोखा VIDEO पाहून वाटेल अभिमान

हा व्हिडिओ (Video) एका शाळेत शूट केला गेला आहे. यात दिसतं, की छतावर चढलेली दोन माकडं ध्वज फडकवणायाचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश येतं

  नवी दिल्ली 21 ऑगस्ट : माकड (Monkey) एक असा प्राणी आहे, जे सतत इकडून - तिकडे उड्या मारत राहतं. अनेकदा माकडाच्या अजब करामतीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत असतात. याच कारणामुळे असे अजब आणि विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होतात. सध्या एका माकडाचा असा व्हिडिओ (Viral Video of Monkey) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ एका शाळेत शूट केला गेला आहे. यात दिसतं, की छतावर चढलेली दोन माकडं झेंडा फडकवणायाचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश येतं. यानंतर माकड स्वतःच थोडं वरती चढतं आणि ध्वज फडकवतं. यानंतर पुष्पवर्षा होऊ लागते. Funny Video: शी! किती हा हावरटपणा; गरम तव्यावरच वऱ्हाड्यांनी मारला हात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन माकडं एका शाळेच्या छतावर उभा आहेत आणि दोघंही ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते दोरी ओढतात तेव्हा ध्वज व्यवस्थित उघडला जात नाही.. यानंतर माकड स्वतःच वरती चढतं आणि हा संपूर्ण ध्वज खोलतं. यानंतर ध्वजामधील फुलं खाली पडू लागताच माकडालाही ही गोष्ट जाणवते की आता आपण योग्य पद्धतीनं झेंडा फडकवला आहे.
  VIDEO वहिनी-दीराचे ठुमके विसराल; लहानग्या भाऊ-बहिणींनी सोशल मीडियावर घातलाय राडा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की माकड असूनही त्यानं अगदी योग्य पद्धतीनं ध्वज फडकवला आहे. दुसऱ्या यूजरनं म्हटलं, की माणसांनीही याच्याकडून काहीतरी शिकायला हवं. याशिवाय इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ Gidda नावाच्या पेजवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ साडेचार हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Live video viral, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या