• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • माकडाने ट्रेनरवरच काढला राग; तलवारीनं केला हल्ला अन्.., पाहा Viral Video

माकडाने ट्रेनरवरच काढला राग; तलवारीनं केला हल्ला अन्.., पाहा Viral Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Monkey) तुम्ही पाहू शकता की एका माकडाच्या हातात तलवार असून शेजारीच त्याचा ट्रेनर बसलेला आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 19 ऑक्टोबर : माणसांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना ट्रेन (Trained Animals) केलं जातं. त्यांची ट्रेनिंग भरपूर कडक असते. जेणेकरून त्यांनी आपल्या मालकाच्या आदेशाचं पालन करावं. मात्र, प्राण्यांना मनोरंजनाचे गुण शिकवणं तितकं सोपं नसतं. अनेकदा ट्रेनिंगदरम्यान प्राणी आपल्या ट्रेनरवरच हल्ला (Animal Attack on Trainer) करतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाली हसू आवरणार नाही. पत्नीनं खरेदी केलेली ती वस्तू पाहून हादरला पती; शॉपिंगवरच घातली बंदी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Monkey) तुम्ही पाहू शकता की एका माकडाच्या हातात तलवार असून शेजारीच त्याचा ट्रेनर बसलेला आहे. हा ट्रेनर माकडाचा हात पकडून त्याला तीन ते चार वेळा आपल्या डोक्यावर तलवार मारण्याचं ट्रेनिंग देतो. मात्र, शेवटी जेव्हा तो माकडाचा हात सोडतो तेव्हा माकड त्याच्या डोक्यावर जोराने वार करतं. हे पाहून लोकांना हसू येतं. हा विनोदी व्हिडिओ @RexChapman नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, की मी माझं हसू आवरू शकत नाही. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 8 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 21 हजारहून अधिकांनी लाईक आणि 3500 जणांनी रिट्विट केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. काय ही विचित्र अट! इथं राहायचंय तर 'या' वेळेला अंघोळ करायला सक्त मनाई या विनोदी व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, बहुतेक या माकडानं एकदाच आपला सगळा राग काढला. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मस्करीत माकडानं खेळ केला. याशिवायही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: