• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • काय ही विचित्र अट! इथं राहायचंय तर 'या' वेळेला अंघोळ करायला सक्त मनाई

काय ही विचित्र अट! इथं राहायचंय तर 'या' वेळेला अंघोळ करायला सक्त मनाई

या अटी पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.

  • Share this:
लंडन, 19 ऑक्टोबर : नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे अनेक जणांना नव्या ठिकाणी घरापासून दूर राहावं लागतं. तेव्हा आपल्याला सोयीचं ठरेल अशा ठिकाणी आपण राहण्यासाठी घर, खोली शोधतो. भाडेतत्त्वावर (Room for Rent) घर शोधणं हे थोडं आव्हानात्मकच असतं. काही घरमालक खूपच कुरकुर आणि कटकट करणारे असतात. अशा घरमालकांच्या अटी (Owner’s Conditions for Tenant) जाचक असतात. इंग्लंडमधल्या (England) नॉर्थ मँचेस्टरमध्ये (North Manchester) अशाच एका घरमालकानं आपलं घर भाड्याने देण्यासाठी अशा अटी घातल्या आहेत, की त्या ऐकून चक्रावून जायला होईल. आपल्या तीन खोल्यांपैकी एक खोली भाड्याने देण्यासाठी संबंधित घरमालकाने ऑनलाइन एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये घरमालकाने भाडेकरूसाठी अटी घातल्या आहेत. या अटी अजबच असून, त्या ऐकून 'घर नको पण अटी आवर' अशीच भावना होईल. ही जाहिरात सध्या Reddit या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हे वाचा - उत्तरपत्रिका पाहून शिक्षक कोमात; असं काय लिहिलंय विद्यार्थ्याने तुम्हीच पाहा या जाहिरातीत दिलेल्या माहितीानुसार, संबंधित घरमालकाला एक खोली आणि स्वयंपाकघर भाड्याने द्यायचं आहे. त्याचं भाडं 945 पौंड म्हणजे भारतीय चलनानुसार 97 हजार रुपये आहे. घरमालक शाकाहारी असल्याने आपला भाडेकरूही शाकाहारी असावा, अशी अट घरमालकाने घातली आहे. भाडेकरूने टीव्ही कधी पाहावा आणि संगीत कधी ऐकावं याची वेळही संबंधित घरमालकाने ठरवून दिली आहे. रात्री 9.30 नंतर भाडेकरू संगीत ऐकू शकत नाही, असं जाहिरातीत म्हटलं आहे. या सर्व अटींमध्ये विचित्र अट म्हणजे, भाडेकरूला रात्री 8 नंतर आंघोळ (new tenant can't have shower in the evening) करण्याची परवानगी नाही. घरी कोणी पाहुणे आले, तर त्यांना घराच्या आतच राहावं लागेल आणि बाथरूम वापरण्याची परवानगी त्यांना नसेल, असं घरमालकाने जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - VIDEO - लगीन सोडून नवरदेवाला घरी जाण्याची घाई, पंडितचा प्रश्न ऐकूनच फुटला घाम भाडेकरूला वायफाय ( Wi-Fi) सुविधा वापरायची असेल, तर त्याने 7500 रुपये वेगळे द्यावेत. तसंच भाडेकरूला खोली आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं लागेल. स्वच्छता राखली आहे की नाही, याची तपासणी घरमालक दर आठवड्याला करील. भाडेकरूला पाळीव प्राणी (Pet) पाळण्याची परवानगी नाही. तसंच घरी जास्त पाहुणे आणण्याची परवानगी दिली जाणार नाही. 'हे माझं घर आहे, तुमचं नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सर्व नियमांचं पालन करावं लागेल,' असंही घरमालकाने जाहिरातीच्या शेवटी लिहिलं आहे. या अजब जाहिरातीवर नेटिझन्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'या ठिकाणी जे राहायला जातील त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे,' असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. 'अशा अटी कोणी घालतं का,' असा सवालही काही जणांनी उपस्थित केला आहे.
First published: