मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पत्नीनं खरेदी केलेली ती वस्तू पाहून हादरला पती; शॉपिंगवरच घातली बंदी, सांगितला विचित्र अनुभव

पत्नीनं खरेदी केलेली ती वस्तू पाहून हादरला पती; शॉपिंगवरच घातली बंदी, सांगितला विचित्र अनुभव

एका व्यक्तीनं आपल्या पत्नीबाबत पोस्ट शेअर केली आणि सल्ला मागितला. या व्यक्तीनं सांगितलं की त्याचं एका वर्षाआधीच लग्न झालं.

एका व्यक्तीनं आपल्या पत्नीबाबत पोस्ट शेअर केली आणि सल्ला मागितला. या व्यक्तीनं सांगितलं की त्याचं एका वर्षाआधीच लग्न झालं.

एका व्यक्तीनं आपल्या पत्नीबाबत पोस्ट शेअर केली आणि सल्ला मागितला. या व्यक्तीनं सांगितलं की त्याचं एका वर्षाआधीच लग्न झालं.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 19 ऑक्टोबर : महिलांना शॉपिंग (Shopping) करायला भरपूर आवडतं, असं म्हटलं जातं. पुरुषही शॉपिंगच्या बाबतीत मागे नसतात. मात्र, शॉपिंग आणि महिलांचं नातं अधिकच खास आहे. अनेकदा विवाहित जोडप्यांमध्ये (Married Couples) या मुद्द्यावरुन भांडण होतं. कारण पार्टनरनं जास्त शॉपिंग केल्यानं त्यांचं महिन्याचं आर्थिक बजेट (Monthly Budget) बिघडतं. या समस्येशी संबंधित एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Post Viral on Social Media) झाली आहे. यात एका पतीनं सांगितलं की त्याची पत्नी शॉपिंगमध्ये भरपूर पैसे खर्च करते (Shopping Budget of Wife). या व्यक्तीला वाटलं की लोक त्याच्या बाजूने बोलतील, मात्र सोशल मीडियावर लोक त्यालाच टोमणे मारू लागले. VIDEO - ट्रेनखाली जाणार होती प्रेग्नंट महिला, जवानाने मृत्यूच्या दारातून खेचलं सोशल मीडिया साईट रेडिटवर एक ग्रुप आहे, यावर लोक आपल्या जीवनातील समस्या सांगतात आणि ग्रुपमधील लोकांकडून सल्ला मागतात. नुकतंच एका व्यक्तीनं या ग्रुपमध्ये आपल्या पत्नीबाबत पोस्ट शेअर केली आणि सल्ला मागितला. या व्यक्तीनं सांगितलं की त्याचं एका वर्षाआधीच लग्न झालं. लग्नानंतर पहिल्या सात महिन्यात त्याच्या पत्नीनं भरपूर शॉपिंग केली. त्याच्या पत्नीला फॅशन आणि स्टायलिंगची भरपूर आवड आहे. तिनं मेकअप आणि ड्रेसिंगसाठी भरपूर पैसे खर्च केले. पतीनं सुरुवातीला तर काही म्हटलं नाही मात्र जेव्हा त्याच्या पत्नीनं ४१ हजाराचा एक कोट खरेदी केला, तेव्हा त्याला वाटलं की आता पाणी डोक्यावरुन जाऊ लागलं आहे. या व्यक्तीनं सांगितलं, की त्यानं आपल्या पत्नीच्या शॉपिंगवरच बंदी घातली. त्यानं सांगितलं की त्याची सॅलरी जास्त नाही. अशात पत्नीच्या खर्चांमुळे घराचं बजेट बिघडतं. यामुळे त्यानं शॉपिंगही बजेटमध्ये आणली. यात त्यानं ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक खर्च करणाऱ्यावर बंदी घातली. पतीनं सांगितलं की मी माझ्या पत्नीला मोठ्या माणसाप्रमाणे एक बजेट दाखवलं आणि सांगितलं की आपण या सीमेपर्यंतच खर्च करायला हवा. मात्र, यावरुन दोघांमध्येही वाद सुरू झाला आणि पत्नी पतीवर दबाव आणल्याचा आरोप करू लागली. पतीनं ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत लोकांकडे सल्ला मागितला की त्यानं हे बरोबर केलं की नाही. हनीमूनसाठी जाणं या कपलला पडलं महागात; 100 वर्षांपूर्वी जमिनीत पुरलेला बाँब फुटला या व्यक्तीची पोस्ट वाचून लोकांनीही त्याला टोमणे मारण्यास सुरुवात केली. काही लोकांनी या घटनेत महिला चुकीची असल्याचं म्हटलं, मात्र अधिक लोकांनी पतीलाच चुकीचं ठरवलं. एकानं म्हटलं, की तुला जर खर्च करणारी महिला आवडत नसेल तर तू लग्नाच्या आधीच याबाबत चर्चा करायला हवी होती.
First published:

Tags: Shopping, Wife and husband

पुढील बातम्या