मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - डान्सिंग आजीने पुन्हा दाखवला आपला जलवा; नातीसोबत केला Cutiepie dance

VIDEO - डान्सिंग आजीने पुन्हा दाखवला आपला जलवा; नातीसोबत केला Cutiepie dance

डान्सिंग आजीचा नातीसोबत भन्नाट डान्स.

डान्सिंग आजीचा नातीसोबत भन्नाट डान्स.

डान्सिंग आजीचा नातीसोबत भन्नाट डान्स.

मुंबई, 15 सप्टेंबर : सोशल मीडियावर डान्सिंग दादी(Dancing dadi) चांगलीच चर्चेत आहे. आपल्या नृत्याने, हावभावाने ही डान्सिंग आजी सर्वांना (Dancing dadi video)  वेड लावत आहे. आता या डान्सिंग आजीने पुन्हा आपला जलवा दाखवला आहे  (Dancing dadi dance video). पण यावेळी ती एकटी नाही तर तिच्यासोबत तिच्या नातीनेही ताल धरला आहे. आजी-नातीचा हा डान्स व्हिडीओ (Dance video) सोशल मीडियावर (Social media) चांगलाच चर्चेत आहे.

सेलिब्रिटींनाही मागे टाकतील अशा रवि बाला शर्मा सोशल मीडियावर डान्सिंग आजी म्हणून फेमस आहेत. त्यांच्या डान्सचे बरेच व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आहेत. वेगवेगळ्या बॉलिवूड गाण्यांवरही आजी थिरकताना दिसताना. आता त्यांनी आपल्या नातीसोबत क्युटी पाई (Cutiepie) गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

आतापर्यंत रवी बाला यांच्या डान्सना नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत होती. आता त्यांनी नातीसोबत केलेला हा डान्सही सर्वांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - मंडपात नवरीबाईला लागली गाढ झोप, नवरदेवाजवळ येत अखेर मैत्रिणीनेच...; VIDEO VIRAL

नृत्य ही या आजींची बालपणापासूनची पॅशन. शाळा आणि कॉलेजात आजींनी डान्स स्पर्धांमध्ये सतत भाग घेतला. मात्र लग्नानंतर त्यांच्या सासरी त्यांचं डान्स करणं कुणालाच पसंत नव्हतं. मग त्यांनी डान्स करणं सोडून दिलं होतं. रवी बाला सांगतात, 'मला लहानपणीपासूनच डान्स खूप आवडायचा. संधी मिळाली, की मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेत नाचू लागायचे. कॉलेजनंतर लग्न झालं. एकामागे एक जबाबदाऱ्या अंगावर पडत गेल्या. डान्स मागेच पडला.

लग्नानंतर 27 वर्षांनी रवी यांच्या पतीचं कॅन्सरनं निधन झालं. रवी मोठ्याच दुःखात बुडाल्या. या दुःखावर उपाय म्हणून त्यांनी पुन्हा एकदा डान्समध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं ठरवलं. आता कुटुंबही त्यांच्यामागे उभं राहिलं. त्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला. हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

हे वाचा - वय वाढलं पण जोश तरुणांसारखा! भररस्त्याच आजोबांची WWF; पाहा VIDEO

आता रवी आपला व्हिडिओ नियमित सोशल मिडियावर टाकू लागल्या. ते व्हायरल झाले (video viral), त्यांचे फॉलोअर्स (followers) वेगानं वाढले. केवळ सामान्य लोक नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्ससुद्धा (Bollywood celebrities) आजींचे चाहते आहेत.

First published:

Tags: Dance video, Viral, Viral videos