पवन कुमार राय, प्रतिनिधी साहिबगंज, 12 जून : कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक युट्यूबर्स प्रकाशझोतात आले. काहीजण तर लोकांना आपल्या घरातलेच वाटू लागले. त्यांचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय काहींच्या दिवसाची सुरुवातच होत नाही, असेही युट्यूबर्स आहेत. याचसंदर्भात झारखंडमध्ये सध्या एक अजब गजब प्रेमकथा गाजतेय. एक अल्पवयीन मुलगी एका युट्यूबरच्या प्रेमात पडली आणि चक्क घरातून पळून त्याचाच घरी जाऊन राहू लागली. मात्र अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील अलवर येथील एका अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावरून युट्यूबर अजित मडैया याच्याशी मैत्री झाली होती. अगदी काही वेळातच या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघं फोनवर बोलू लागले. त्याचदरम्यान दोघांचा भेटण्याचा प्लॅन झाला. मात्र झारखंडच्या या युट्यूबरने तिला भेटायला राजस्थानात येण्यास नकार दिला. मग मुलगी त्याच्या प्रेमाखातर राजस्थानातून झारखंडला जाण्यास तयार झाली. पुढचा मागचा विचार न करता ती लपूनछपून राजस्थानच्या अलवार पोलीस स्थानक परिसरातून पळाली मिर्झा चौकी रेल्वे स्थानकावर पोहोचली. अजित मडैया तिथे तिची वाट पाहत आधीच हजर होता. तो तिला पिंडरा गावात घेऊन गेला आणि दोघं एकत्र राहू लागले. 8 जूनपासून ते एकत्र राहत होते.
तर दुसरीकडं मुलीच्या काळजीने कासावीस झालेल्या तिच्या नातेवाईकांनी अलवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत तपास केल्यानंतर मुलगी झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील मिर्झा चौकी पोलीस स्थानक क्षेत्राच्या पिंडरा गावात असल्याचे आढळून आले. मग पोलिसांसह मुलीचे कुटुंबीय तातडीने मिर्झा चौकी पोलीस स्थानकात दाखल झाले. Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा छापा टाकून पिंडरा गावातून या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं. तर अजितला चौकशीसाठी पोलिसांनी मिर्झा चौकीत नेलं आणि राजस्थान पोलीस मुलीला घेऊन राजस्थानला रवाना झाले. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी राजस्थान पोलिसांत केवळ मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती, याव्यतिरिक्त अजितविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तसेच कोणतेही वॉरंट नसल्याने चौकशी केल्यानंतर पीआर बाँड भरून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं.