जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत महत्त्वाची अपडेट

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत महत्त्वाची अपडेट

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 500 ते 600 किमी दूर असून ते गुजरातला धडकणार आहे. यादरम्यान मुंबईत वाऱ्याचा वेग 55 ते 60 किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी म्हटलं आहे. मुंबई आणि परीसरात पुढील 48 तासांत तुरळक ठिकाणी मेघगर्जानांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता   चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जूनदरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड, आणि मोरंबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्यानं या भागात चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Cyclone Biperjoy : 125 ते 135 किमी वेगानं धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज   राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण  दरम्यान राज्यात रविवारी मान्सून दाखल झाला आहे. मान्सूसाठी  राज्यात सध्या अनुकूल वातावरण असून, पुढील 48 तासांत मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत 50 ते 60 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. मच्छिमारांना आवाहन  दरम्यान हवामान विभागाकडून बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना देखील आवाहन करण्यात आलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळ समुद्रात असेपर्यंत मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात  आला आहे. तसेच गणपतीपुळेचा समुद्र किनारा समुद्र शांत होईपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात