नवी दिल्ली 16 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं (Viral Videos of Children's) पाहायला मिळतं. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमधील चिमुकलीचं कौशल्य नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ही लहान मुलगी रबराप्रमाणेच लवचिकतेसोबत जबरदस्त स्टंट (Stunt Video of Small Girl) करत आहे. या मुलीचं हैराण करणारं टॅलेंट पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिला रबर गर्ल (Rubber Girl) म्हणत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 47 लाख जणांनी पाहिला आहे.
VIDEO: आजीबाईनं वयाच्या 90 व्या वर्षी सुरू केला व्यवसाय; कमाईसोबतच झाल्या Star
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) पाहून अंदाज येतो की हा व्हिडिओ कुठल्या तरी कराटे ट्रेनिंग सेंटरमधील आहे. यात अनेक लहान मुलं बसलेली दिसत आहेत. सुमारे 4 वर्षाची एक मुलगी कराटेप्रमाणे पोज देत आहे. यानंतर ती आपले दोन्ही हात बाजूला घेऊन आपल्या पायांनी डोक्याला स्पर्श करून वॉक करू लागते. यानंतर ती कोलांटी उड्या मारू लागते. एक राऊंड पूर्ण होताच ती आपलं शरीर फोल्ड करते आणि जमिनीवर उड्या घेत पुढे सरकू लागते.
This is INSANE!
The bit at the end 😱 pic.twitter.com/Vcep9dQ0aT — Ann is still European ♥️ Vaxxed AF still masking (@56blackcat) August 12, 2021
दरीत कोसळत होती कार...; भारतीय सैन्य दलाने चालकाचा वाचवला जीव, VIDEO VIRAL
या व्हिडिओमध्ये चिमुकलीचे स्टंट अत्यंत जबरदस्त आहेत. हे स्टंट पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतं, की ही चिमुकली आपले हातपाय स्ट्रेच करून खांद्यावर ठेवते. यानंतर पोटाच्या बाजूनं जमिनीवर झोपते आणि संपूर्ण शरीर फिरवण्यास सुरुवात करते. तिला पाहून असं वाटतं, की तिचं शरीर एखाद्या बेयरिंगवर फिट केलंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.