मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: आजीबाईनं वयाच्या 90 व्या वर्षी सुरू केला हा व्यवसाय; 5 वर्षात बक्कळ कमाईसोबतच झाल्या Insta Star

VIDEO: आजीबाईनं वयाच्या 90 व्या वर्षी सुरू केला हा व्यवसाय; 5 वर्षात बक्कळ कमाईसोबतच झाल्या Insta Star

या आजीबाईनं पाच वर्षाआधी म्हणजे वयाच्या 90 व्या वर्षी आपला बिजनेस (New Business) सुरू केला. आता त्यांची मिठाई आणि इतर पदार्थ देशभरात प्रसिद्ध आहे.

या आजीबाईनं पाच वर्षाआधी म्हणजे वयाच्या 90 व्या वर्षी आपला बिजनेस (New Business) सुरू केला. आता त्यांची मिठाई आणि इतर पदार्थ देशभरात प्रसिद्ध आहे.

या आजीबाईनं पाच वर्षाआधी म्हणजे वयाच्या 90 व्या वर्षी आपला बिजनेस (New Business) सुरू केला. आता त्यांची मिठाई आणि इतर पदार्थ देशभरात प्रसिद्ध आहे.

नवी दिल्ली 16 ऑगस्ट : मनात काही करण्याची इच्छा असेल तर वय अडथळा ठरत नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral) एका 95 वर्षाच्या हरभजन कौर नावाच्या आजीचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या आजीबाईनं पाच वर्षाआधी म्हणजे वयाच्या 90 व्या वर्षी आपला बिजनेस (New Business) सुरू केला. आता त्यांची मिठाई आणि इतर पदार्थ देशभरात प्रसिद्ध आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आजीचा प्रेरक प्रवास पाहायला (Inspiring Video of Old Woman) मिळतो.

OMG! असा कसा डॉक्टर, ऑपरेशननंतर हाड गायब; आता अर्धवट डोकं घेऊ फिरतेय व्यक्ती

90 वर्षाच्या हरभजन कौर (Harbhajan Kaur Entrepreneur) यांच्या मनात अचानक असा विचार आला की त्यांनी स्वतः आतापर्यंत काहीही कमावलं नाहीये. यानंतर त्यांच्या मुलीनं त्यांना बेसनची बर्फी (Harbhajan Kaur Barfi) बनवून विकण्याचा सल्ला दिला. पहिल्याच दिवशी त्यांच्या मिठाईच्या डब्यांची चांगली विक्री झाली आणि त्यांनी पहिल्यांदा 2000 रुपये आपल्या मेहनतीनं कमावले. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर त्यांची ही कहाणी चांगलीच व्हायरल होत आहे.

VIDEO : पत्नीसोबत डान्स करत होता नवरोबा; पॅन्ट कधी खाली घसरली कळलंच नाही अन्..

हळूहळू आजीबाईला इन्स्टाग्रामच्या (Instagram) मदतीनंही ऑर्डर मिळू लागले. आता त्या देशभरात आपल्या मिठाई, चटणी आणि राखी हँपरची डिलिव्हरी देतात. त्यांच्या नातीनं त्यांना इन्स्टाग्रामवर स्टार बनवलं आहे. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ कित्येक हजार आणि लाखो व्ह्यूज येतात. ऑफिशियल ह्यूमंस ऑफ बॉम्बेनं त्यांची ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. याला 1 करोडहून अधिक व्ह्यूज मिळाले. दुसऱ्या लाटेदरम्यान हरभजन कौर यांना कोरोनाची लागण झाली होती, मात्र तरीही त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. कोरोनावर मात करत त्यांनी आपला व्यवसाय एका नव्या उंचीवर पोहोचवला.

First published:
top videos

    Tags: Business, Inspiring story, Nari Shakti, Video Viral On Social Media, Viral news