मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दरीत कोसळत होती कार...; भारतीय सैन्य दलाने चालकाचा वाचवला जीव, VIDEO VIRAL

दरीत कोसळत होती कार...; भारतीय सैन्य दलाने चालकाचा वाचवला जीव, VIDEO VIRAL

भारतीय सैन्याच्या धाडसाचं नेहमीच कौतुक केलं जात. केवळ सीमेवरही नाही तर अडचणीत सापडलेल्यांसाठी जवान धावून येतात.

  • Published by:  Meenal Gangurde
उत्तराखंड, 15 ऑगस्ट : आज देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन (independence day) साजरा करण्यात आला. ठिकाठिकाणी ध्वजारोहण करीत देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले सर्व जवान जिवाची पर्वा न करता रक्षणासाठी लढाई देत आहे. ते केवळ सीमेवरच नाही अडीअडचणीत सापडलेल्या सर्वांच्याच रक्षणासाठी पुढे येऊन मदत करताना दिसतात. काश्मीर असो वा उत्तराखंड येथील जवान नेहमीच अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी धावून पुढे आले आहेत. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आर्मी जवान एका नागरिकाची मदत करीत असताना दिसत आहे. आर्मी जवानांनी प्रसंगावधान राखल्यामुळे त्या नागरिकाचा जीव वाचला आहे. (The car was crashing into the valley Indian Army rescues driver VIDEO VIRAL) हे ही वाचा-VIDEO : 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तादरम्यान पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न उत्तराखंडमधील माणा येथे कार रेस्क्यू करीत असतानाचा हा व्हिडीओ आहे. भारत-तिबेट सीमा जवानांनी एक व्यक्ती आणि कार वाचवली आहे. ITBP पर्वतारोहण अभियान दल पराक्रमच्या सदस्यांनी आज सकाळी 11 वाजता बचाव अभियान चालवलं आणि अपघात झालेल्या कारला आणि व्यक्तीला सुखरुप बाहेर काढलं. या रेस्क्यू ऑपरेशनमुळे कार चालकाची जीव वाचला आहे. यामुळे ITBP जवानांचं खूप कौतुक केलं जात आहे. त्याच्या धाडसाला लोक सलाम करीत आहेत.
First published:

Tags: Crane accident, Independence day, Live video, Video viral

पुढील बातम्या