मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मोठी दुर्घटना: कारवर कोसळलं हेलिकॉप्टर; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

मोठी दुर्घटना: कारवर कोसळलं हेलिकॉप्टर; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

एक नौदलाचं हेलिकॉप्टर अचानक कमी उंचीवर उडत असतानाच जमिनीवर क्रॅश (Helicopter Crash) झालं. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की वैमानिकानं हा अपघात रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 ऑगस्ट : ट्रेन, बस आणि कारच्या अपघातांबाबत (Accident) तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी आकाशात होणारा अपघात पाहिलाय का? अनेकदा हेलिकॉप्टर किंवा विमानं काही तांत्रिक अडणींमुळे क्रॅश होतात. सोशल मीडियावर (Social Media Viral) सध्या मॅक्सिकोमधील एका हेलिकॉप्टरच्या क्रॅशचा व्हिडिओ (Mexico Helicopter Crash) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण (Shocking Video) झाले आहेत.

सासऱ्यानं पळून जात सुनेसोबत केलं लग्न, काही वर्षांनी बाळाला घेऊन घरी परतले पण...

सोशल मीडियावर मॅक्सिकोमध्ये झालेल्या एका दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Helicopter Crash Landing Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण तर हवाई यात्रा करण्यासच घाबरू लागले आहेत. मॅक्सिकोमधील एक नौदलाचं विमान अचानक कमी उंचीवर उडत असतानाच जमिनीवर क्रॅश झालं. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की वैमानिकानं हा अपघात रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला.

आधी गाडी अडवली, मग बंदुकीचा धाक दाखवत भररस्त्यात महिलेला लुटलं, Shocking Video

मिळालेल्या माहितीनुसार, नौदालाचं हे विमान मॅक्सिकोमधील वादळात अडकल्यामुळे क्रॅश झालं आहे. आकाशात झेप घेताच हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी अडचण आल्यानं हे हेलिकॉप्टर अतिशय कमी उंचीवर आलं होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आधी हे हेलिकॉप्टर अतिशय कमी उंचीवर येतं. यानंतर आधी हे एका कारला धडकतं. वैमानिक हा अपघात टाळण्याचा आणि हेलिकॉप्टर बॅलन्स करण्याचा भरपूर प्रयत्न करतो. मात्र, पुन्हा एकदा ते एका व्हॅनला धडकतं. दोन्ही गाड्या वाचल्या मात्र हेलिकॉप्टरचं नुकसान झालं. या घटनेत नौदलाचे चार जवान जखमी झाल्याचं समोर आलं आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Crash, Shocking viral video