मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सुनेच्या प्रेमात पडला सासरा; पळून जात केलं लग्न, काही वर्षांनी बाळाला घेऊन घरी परतले पण...

सुनेच्या प्रेमात पडला सासरा; पळून जात केलं लग्न, काही वर्षांनी बाळाला घेऊन घरी परतले पण...

हातावरच्या सगळ्यात छोट्या बोटाखाली बुधाचा उंचवट्यापर्यंत जाणाऱ्या रेषेला विवाह रेषा म्हटलं जातं.

हातावरच्या सगळ्यात छोट्या बोटाखाली बुधाचा उंचवट्यापर्यंत जाणाऱ्या रेषेला विवाह रेषा म्हटलं जातं.

महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. यानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. तिनं आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केलं

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 27 ऑगस्ट : प्रेमात वयाचं बंधन नसतं, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अनेकजण प्रेमासाठी (Love Story) समाजाच्या विरोधात जातात, असे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र, आता एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एका सासऱ्याचंच आपल्या सुनेवर प्रेम जडलं. इतकंच नाही तर यानंतर सासरा आपल्या सुनेला घेऊन पळूनही गेला. यात सुनेचीही सहमती (Father In Law Ties Knot With Daughter In Law) होती. नंतर काही वर्षांनी दोघंही आपल्यासोबत एक दोन वर्षांचं बाळ घेऊन घरी परतले. VIDEO - आता केक कापणार नाही तर...; बर्थडेवरून भडकलेल्या GF ने BF ला दिली धमकी इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायूमधील बिसोली कोतवाली परिसरातील दबथरा गावातील आहे. महिलेच्या आधीच्या पतीनं आपल्या पत्नी आणि वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पंचायत बोलवण्यात आली. मात्र, सर्वांनी सासरे आणि सुनेच्या बाजूनेच निर्णय दिला. महिलेचं लग्न जेव्हा तिच्या पहिल्या पतीसोबत झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. यानंतर महिलेनं पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. महिलेनं आपल्या इच्छेप्रमाणे सासऱ्यासोबत लग्न केलं. नर्सचा डान्स VIDEO घालतोय धुमाकूळ; व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी घेतली अ‍ॅक्शन समोर आलेल्या वृत्तानुसार, महिला आणि तिच्या पहिल्या पतीचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. घाईत लग्न करण्याचं कारण एका वर्षापूर्वीच झालेलं मुलाच्या आईचं झालेलं निधन होतं. यानंतर मुलासोबत लग्न केलेल्या सुनेवरच सासऱ्याचं प्रेम जडलं आणि नंतर दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले. यानंतर महिलेनं निर्णय घेतला की पतीसोबत घटस्फोट घेऊन ती सासऱ्यासोबत लग्नगाठ बांधेल. आपल्या सुनेसोबत लग्नगाठ बांधणाऱ्या व्यक्तीचं नाव देवानंद आहे. त्यांचं वय सुमारे 45 वर्ष आहे. लग्नानंतर सहा महिन्यांतच संबंधित महिला आणि तिच्या पतीच्या नात्यात दुरावा आला होता. यानंतर महिलेची आपल्या सासऱ्यासोबत जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्न केलं.
First published:

Tags: Marriage, Viral news

पुढील बातम्या