Home /News /viral /

धावत्या मेट्रो ट्रेनवर चालताना दिसले 8 लोक; Shocking Video पाहून येईल अंगावर काटा

धावत्या मेट्रो ट्रेनवर चालताना दिसले 8 लोक; Shocking Video पाहून येईल अंगावर काटा

हा व्हिडिओ एका स्थानिक व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. यात चालत्या ट्रेनच्या वर अनेक लोक उभे असल्याचं पाहायला मिळतं (Men Walks on Running Train).

    नवी दिल्ली 13 जून : अमेरिकेतील ब्रुकलिनमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. थरकाप उडवणारा हा व्हिडिओ (Shocking Video Viral) 10 जूनचा आहे. हा व्हिडिओ एका स्थानिक व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने शुक्रवारी ब्रुकलिनमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यात चालत्या सबवे ट्रेनच्या वर अनेक लोक उभे असल्याचं पाहायला मिळतं (Men Walks on Running Train). हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता दुचाकी; अचानक आरामात झोपला, VIDEO पाहून व्हाल शॉक मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्कर ख्रिस 'गूज' गोस्लिंगने सांगितलं की जे-ट्रेन विल्यम्सबर्ग ब्रिज ओलांडत असताना त्याच्यावर लोक उभा राहिलेले पाहून आश्चर्य वाटलं. गोस्लिंगने ट्विटरवर लिहिलं की, 'हे लोक ट्रेनच्या वर बसून विल्यम्सबर्ग ब्रिजवर आले.' या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून यात आठ लोक ट्रेनवर उभा असल्याचं पाहायला मिळतं. गोसलिंगने पोस्ट केलेला हा व्हिडिओ ट्विटरवर लाखो वेळा पाहिला गेला आहे. न्यूयॉर्क पोलीस विभागाने (NYPD) या घटनेची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. 2021 मध्ये विल्यम्सबर्ग ब्रिजजवळ जे ट्रेनमधून पडून एका मेट्रो सर्फरचा मृत्यू झाला होता. बेस्ट बसमध्ये चढू दिलं नाही, गाडी थांबवून फोडली काच, मुंबईत तरुणाच्या हिरोपंतीची VIDEO व्हायरल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरवर @GooseMane नावाच्या अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर व्हिडिओ 1.42 लाखहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ रिट्विट करणाऱ्या बहुतांश लोकांनी अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर अनेकजण हे दृश्य पाहून हैराण झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Stunt video, Train

    पुढील बातम्या