जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / बेस्ट बसमध्ये चढू दिलं नाही, गाडी थांबवून फोडली काच, मुंबईत तरुणाच्या हिरोपंतीची VIDEO व्हायरल

बेस्ट बसमध्ये चढू दिलं नाही, गाडी थांबवून फोडली काच, मुंबईत तरुणाच्या हिरोपंतीची VIDEO व्हायरल

 कंडक्टरने बसमध्ये चढू न दिल्यामुळे संतापलेला तरुण गाडीच्या समोर जाऊ उभा राहिला

कंडक्टरने बसमध्ये चढू न दिल्यामुळे संतापलेला तरुण गाडीच्या समोर जाऊ उभा राहिला

कंडक्टरने बसमध्ये चढू न दिल्यामुळे संतापलेला तरुण गाडीच्या समोर जाऊ उभा राहिला

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 जून : मुंबईतील (mumbai) मालाड परिसरात बेस्ट बसमध्ये (mumbai best bus) चढू दिलं नाही म्हणून एका तरुणाने भर रस्त्यावर बस थांबवली आणि काच फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. मुंबईतील मालाड परिसरात आज सकाळी ही घटना घडली आहे. बसमार्ग क्रमांक ३४५ ची बेस्ट बस  मीठचौकी सिग्नलवर सकाळी ९.४५ वाजता उभी होती.  त्यावेळी एक तरुण बेस्ट बस पूर्णपणे भरलेली असताना आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पण बसमध्ये जागा नसल्यामुळे कंडक्टरने त्याला मागील बसमध्ये चढण्याचा सल्ला दिला.

पण त्याने बसमध्ये चढण्याचा हट्ट केला. कंडक्टरने बसमध्ये चढू न दिल्यामुळे संतापलेला तरुण गाडीच्या समोर जाऊ उभा राहिला. चालकाला जोरजोरात ओरडून वाद घालत होता. त्यानंतर हातात एक दगड घेऊन गाडीच्या मारून काच फोडली. हा सगळा प्रकार बसमधील कंडक्टरने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ( Rajya Sabha Election:देशमुख-मलिकांच्या मतांवर अखेर ‘पाणी’,महाविकास आघाडीला धक्का ) त्यावेळी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनीही त्याची समजूत काढली. पण, हा तरुणा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेरीस  तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसाने त्याला ताब्यात घेतलं आणि बांगरनगर पोलीस स्टेशनला नेऊन गुन्हा दाखल केला आहे.  या तरुणाचं नाव अंथेनो राबेरो असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात