व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खूप जड दिसणारी बाईक चालवताना दिसत आहे. तो अगदी आरामात हँडलवरून हात काढतोय आणि मग बाईकवर मागे झुकतोय. बाईक इतकी जड आहे की ती स्थिर चाललेली आहे. मध्येच तो बाईकवर पूर्णपणे झोपलेला दिसतो. त्याच्या शेजारुन इतरही गाड्या जाताना दिसतात. एका दुचाकीवर 10 जण करत होते प्रवास; अचानक पुढचं चाक हवेत उचललं अन्..., पाहा VIDEO या व्हिडिओला २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर २ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाइक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की, या व्यक्तीला बाईक चालवताना पाहून समजतं की त्याला दुचाकी कशी चालवायची हे खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटलं की अशा लोकांवर गाडी चालवण्यास बंदी घातली पाहिजे. तर आणखी एकाने म्हटलं की याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द व्हायरल हवे. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.व्यक्तीचा रस्त्यावर धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/zQapibvaJE
— News18Lokmat (@News18lokmat) June 11, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.