तिरुवनंतपुरम, 28 मार्च : हा फोटो नीट पाहा. यात तुम्हाला कोण दिसते आहे? साहजिकच तुम्ही म्हणाल महिला . साडी नेसलेली, कुरळे केस मोकळे सोडलेली, कानात झुमके, डोक्यावर टिकली, चमकदार चेहरा आणि त्या चेहऱ्यावर गोड हसू. सुंदर अशी ही महिला, जिला पाहताच काही जण तिच्या प्रेमातही पडले असतील. या महिलेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामागील कारणही खास आहे. या फोटोतील महिलेचं सत्य समजल्यानंतर तुम्हालाही यावर विश्वास बसणार नाही. आयआरएएस ऑफिसर अनंत रूपनागुडी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात या महिलेचा फोटो आहे. फोटोतील ही महिला का चर्चेत आली असावी असं तुम्हाला वाटतं. कोण आहे ही महिला, का आली चर्चेत, काय आहे तिचं सत्य? याबाबत तुम्ही काही अंदाज लावू शकता का? तुम्हाला काही माहिती आहे का? डोक्याला थोडा जोर लावून बघा, तुम्हाला जमतंय का? Shocking! फूलझाडांचं ‘डर्टी सिक्रेट’; CCTV पाहताच मालक हादरला रूपनागुडी यांनी ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील एका उत्सवातील हा फोटो आहे. कोल्लम जिल्ह्यातील कोट्टमकुलकारा परिसरातील देवीचं एक मंदिर आहे. जिथं मयाविलक्कू उत्सव असतो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आणि केरळ टुरिझ्मच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार केरळमधील हा सण दिव्यांचा सण असतो. मल्याळम महिना मीनमच्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी म्हणजे मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा उत्सव असतो.
या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यात पुरुष महिला बनतात. म्हणजे पुरुष महिलांसारखे तयार होतात आणि या उत्सवात सहभाही होतात. पुरुष महिलांसारखे दागिने-ड्रेस घालून, मेकअप करून नटूनथटून मशाल, दिवे घेऊन येतात. बॉसने ऑफिसमध्ये वाटली मिठाई, खाताच कर्मचाऱ्याला धक्का; एका रात्रीत ती प्रेग्नंट या फोटोत दिसणारी महिलाही महिला नाही तर पुरुष आहे, जी या उत्सवात सहभागी झाला. या उत्सवात त्याला पहिला पुरस्कार मिळाला. हा त्याच दिवसाचा फोटो आहे.
The Devi Temple in Kottamkulakara in Kollam district in Kerala has a tradition called the Chamayavilakku festival.
— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) March 27, 2023
This festival is celebrated by men who are dressed as women. The above picture is that of the man who won the first prize for the make up In the contest. #festival pic.twitter.com/ow6lAREahD
या उत्सवात समलैंगिक लोकही या उत्सवात सहभागी होतात कारण हाच एक उत्सव असा आहे, ज्यात ते त्यांचं सत्य, खऱं आयुष्य मोकळेपणाने जगतात.