जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! इथे कमी वयाच्या मुलींना जबरदस्ती बनवलं जातं आई; चालवल्या जातात मुलं जन्माला घालण्याच्या फॅक्ट्री

Shocking! इथे कमी वयाच्या मुलींना जबरदस्ती बनवलं जातं आई; चालवल्या जातात मुलं जन्माला घालण्याच्या फॅक्ट्री

Shocking! इथे कमी वयाच्या मुलींना जबरदस्ती बनवलं जातं आई; चालवल्या जातात मुलं जन्माला घालण्याच्या फॅक्ट्री

इथे मुलं जन्माला घालणाऱ्या फॅक्ट्री चालवल्या जात आहेत. ‘बेबी फार्मिंग’ (Baby Farming) नावाने हा धंदा अगदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जानेवारी : जगात अशा अनेक अजब गोष्टी (Weird Things) आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकूनच कोणीही हैराण होईल. अनेकदा या गोष्टी इतक्या विचित्र असतात की ऐकणाऱ्याला धक्काच बसतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हीही विचारात पडाल. अफ्रिकेच्या एका देशात अशा काही फ्रॅक्ट्री आहेत, जिथे सामान नाही, तर मुलं जन्माला घातली जातात (Baby Factory in Africa).

एकतर्फी प्रेमातून पुण्यातील डॉक्टरने हद्द केली पार; कांड वाचून बसेल धक्का

नायजेरियामध्ये हे विचित्र काम सुरू आहे. इथे मुलं जन्माला घालणाऱ्या फॅक्ट्री चालवल्या जात आहेत. ‘बेबी फार्मिंग’ (Baby Farming) नावाने हा धंदा अगदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे (Baby Selling Business in Nigeria). हे जाणून तुम्हीही हैराण व्हाल की इथे कमी वयाच्या आफ्रिकन आणि इतर देशातील मुलींना जबरदस्ती गरोदर केलं जातं आणि त्यांना मुलं जन्माला घालण्यास भाग पाडलं जातं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे इथे 14 वर्षाच्या मुलीलाही आई बनवलं जातं. मुलं नसलेल्या जोडप्यांसाठी हा व्यावसाय सुरू केला गेला आहे. इथे या मुलींना आई बनवून मुल नसलेल्या कपल्सला ही बाळं विकली जातात. यासाठी हे कपल्स मोठी रक्कम देतात. यामुळे अनेकदा आर्थिक अडचणींमुळे महिला आणि मुली स्वतः चालून या फॅक्ट्रीमध्ये येतात, तर अनेकदा जबरदस्तीने अपहरण करून त्यांना इथे आणलं जातं आणि यानंतर त्यांना सरोगेट मदर बनण्यास भाग पाडलं जातं. हे जाणून तुम्हीही हैराण व्हाल की हा व्यावसाय केवळ नायजेरियामध्येच नाही तर इंडोनेशिया, यूक्रेनसह अनेक देशांमध्येही सुरू आहे. बेबी फार्मिंगसारखा व्यापार रुग्णालये आणि अनाथ आश्रमांसारख्या ठिकाणीही लपून केला जात आहे. नायजेरियामधील हा व्यापार अतिशय धोकादायक होत चालला आहे.

तो शब्द खटकल्याने पत्नीने दिला संबंधास नकार, पतीविरोधात बलात्काचा गुन्हा दाखल

गार्डियन वेबसाईच्या 2011 च्या रिपोर्टनुसार, एका छाप्यादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 32 गरोदर तरुणींची सुटका केली होती, ज्यांना जबरदस्ती इथे आणण्यात आलं होतं. इथे बाळांना जन्म देणाऱ्या मुलींचं वय 14 ते 17 वर्ष असतं आणि त्या आपल्या इच्छेनुसार गर्भपातही करू शकत नाहीत. कारण देशाचा कायदा त्यांना यासाठी परवानगी देत नाही. 3-4 लाख रुपयांमध्ये इथे बाळांना विकलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात