Home /News /pune /

एकतर्फी प्रेमातून पुण्यातील डॉक्टरने हद्द केली पार; कांड वाचून बसेल धक्का

एकतर्फी प्रेमातून पुण्यातील डॉक्टरने हद्द केली पार; कांड वाचून बसेल धक्का

Crime in Beed: एकतर्फी प्रेमातून (One sided love) पुण्यातील एका डॉक्टरने भलताच कांड केला आहे. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे प्रकरणाचा छडा लावला आहे.

    बीड, 08 जानेवारी: एकतर्फी प्रेमातून (One sided love) पुण्यातील (Pune) एका डॉक्टरने भलताच कांड केला आहे. त्यानं बीडमध्ये राहणाऱ्या आपल्या वर्गमैत्रिणीच्या नावानं बनावट इन्स्टाग्राम अकाउंट (Create fake account on Instagram) काढून तिच्या मैत्रिणींशी चॅटींग केली आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. संबंधित प्रकार लक्षात आल्यानंतर, पीडित युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर, सायबर पोलिसांनी अखेर या गुन्ह्याची उकल केली असून बनावट खातं तयार करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड (Beed) शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका डॉक्टर युवतीच्या नावाने दीड महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर कोणीतरी बनावट अकाउंट तयार केलं होतं. यासाठी पीडित युवतीचा फोटो आणि नावाचा वापर करण्यात आला होता. संबंधित अकाउंटवरून आरोपीनं पीडितेच्या मैत्रिणींशी चॅटींग करण्यात आलं होतं. पण हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पीडित डॉक्टर तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. हेही वाचा-पाकमधील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी प्रेयसीचा प्रताप, बॉर्डर क्रॉस करण्याच्या तयारीत तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी इन्स्टाग्रामशी संपर्क साधून संबंधित अकाउंटबाबत माहिती मागवली. यावेळी डॉ. गोपाळ दहिवाळ (रा. पुणे) याने पीडित तरुणीचा फोटो आणि नाव वापरून इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला सायबर सेलमध्ये हजर राहण्यास सांगून त्याची कसून चौकशी केली. तसेच त्याच्याकडील मोबाइल देखील जप्त केला आहे. हेही वाचा-फिरवण्याच्या बहाण्याने धुळ्यातील तरुणीवर कारमध्येच विकृत कृत्य; आरोपीला अटक संशयित आरोपी डॉक्टर दहिवाळ आणि फिर्याद दाखल करणारी तरुणी हे वर्गमित्र आहेत. दोघंही बीएचएमएसचं शिक्षण घेताना एकाच वर्गात होते. याच ओळखीतून आरोपी पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता. यातूनच त्याने हा कांड केल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Cyber crime, Pune

    पुढील बातम्या