अहमदाबाद 08 जानेवारी : भारतीय दंडसंहितेमध्ये वैवाहिक बलात्काराला
(Marital rape) अद्याप गुन्हा समजलं जात नाही; मात्र हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. गुजरातमध्ये एका 20 वर्षीय तरुणीने आपल्या पतीविरोधात असाच बलात्काराचा
(woman filed rape case against husband) गुन्हा दाखल केला आहे. याला कारण म्हणजे, पत्नीने संबंध ठेवण्यासाठी दिलेला नकार. पतीने ‘अस्पृश्य’ म्हटल्यामुळे या पत्नीने त्याला आपल्यापासून दूर राहण्यास
(wife refuses sex on being called untouchable) सांगितलं. यामुळेच गेल्या तीन महिन्यांपासून तिने संबंध ठेवण्यासही नकार दिला; मात्र यामुळे संतापलेल्या पतीने तिला मारहाण करून गेल्या काही महिन्यांमध्ये तिच्यावर बलात्कार
(Husband raped wife after she denied sex) केल्याचं तिनं सांगितलं.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातल्या जोताना तालुक्यात ही घटना घडली. ही महिला एससी प्रवर्गातली
(SC category) आहे, तर तिचा पती दरबार समाजातला (Darbar community) आहे. दोन सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर ते मेमनगर
(Memnagar wife untouchable case) शहरात राहत होते. या तरुणीने आपल्या तक्रारीत सांगितल्याप्रमाणे, लग्नानंतर दोन महिने सर्व काही सुरळीत सुरू होतं; मात्र त्यानंतर तिच्या पतीने छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे सुरू केली.
नाशकातील जंगलात 10 वर्षीय मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार; ऐनवेळी गुराखी आला अन्
“तू खालच्या जातीची असल्यामुळे मला घरातून बाहेर पडता येत नाही. येता-जाता लोक मला टोमणे मारतात,” असं तिचा पती तिला म्हणत असे. पतीसोबतच तिच्या सासरच्या व्यक्तीही जेव्हा त्यांच्याकडे येत, तेव्हा वेळोवेळी तिला खालच्या जातीतली असल्यावरून टोमणे मारत (SC wife thrashed by husband) होते. कित्येक वेळा तिचा अस्पृश्य (SC wife called as untouchable by husband) म्हणून अपमान करत होते.
यामुळे चिडून ती हळूहळू पतीसोबत संबंध ठेवण्यास नकार देऊ लागली. ‘जर मी अस्पृश्य आहे, तर माझ्यासोबत संबंध कसे ठेवू शकता?’ असं म्हणून तिने संबंध ठेवण्यास नकार (SC wife refuses sex after husband calls her untouchable) दिला. यानंतर पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच, काही वेळा तिच्यावर जबरदस्ती करून संबंध ठेवले. सोमवारीदेखील (3 जानेवारी 22) तिच्या पतीने काही तरी भांडण काढून तिला लोखंडी रॉडने मारहाण (Wife raped and thrashed for refusing sex) केली. यामुळे ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर ती जोतानामध्ये आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर मंगळवारी तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तिथे मेडिको-लीगल कम्प्लेंट दाखल करण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे घाटलोडिया पोलिसांनी आरोपी पतीविरोधात घरगुती हिंसाचार (Domestic Violence) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.