नवी दिल्ली 07 मे : आजकाल सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे मजेदार व्हिडिओ (Viral Videos of Pet Animals) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची विशेष पसंतीही मिळते. नुकताच असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये (Funny Video) एक भलामोठा पाळीव श्वान आपल्या मालकाशी खेळताना दिसत आहे. VIDEO - श्वानांसमोर शक्तिशाली बिबट्याचीही तंतरली; शिकार सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड सहसा प्रत्येकाला पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. बहुतेक लोक श्वान पाळण्यास पसंती देतात. पाळीव श्वान अनेकदा त्यांच्या मालकांसोबत मस्ती करताना दिसतात. मालकासोबत मस्ती करताना श्वान अनेकदा त्यांच्या अंगावर चढताना दिसतात. नुकतंच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळतं (Man Playing with Pet Dog). ज्यामध्ये एक मोठा श्वान आपल्या मालकाच्या अंगावर धावून जातो आणि मालकालाच थेट पाण्यात पाडतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मालक आपल्या दोन श्वानांसह नदीच्या काठावर बोटीत फिरताना दिसत आहे. मालक इथे आपल्या श्वानाला काहीतरी खाण्यासाठी देत असल्याचा इशारा करतो आणि त्याला आपल्या छातीवर चढण्यास सांगतो. मालकाने बोलवताच अतिउत्साहात हा श्वान धावत मालकाकडे येतो आणि उडी घेऊन त्याच्या छातीवर आपले पाय ठेवतो. आई कांगारूप्रमाणे पेहराव करून आला व्यक्ती; बघताच पिल्लाने केलं हे काम, मन जिंकणारा VIDEO यादरम्यान हा श्वान मोठा आणि जास्त वजनाचा असल्याने हा व्यक्ती थेट पाण्यात कोसळतो. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकजण व्हिडिओ मजेशीर कमेंटही करत आहेत.