मुंबई, 06 मे : जंगलात सिंह, वाघ, बिबट्या हे सर्वात शक्तिशाली प्राणी. यांच्यासमोर कोणत्याच प्राण्याचं काही चालत नाही. त्यांना दूरून पाहताच किंवा त्यांच्या आवाज ऐकताच जंगलातील इतर प्राणी धूम ठोकतात. पण काही वेळा काही प्राणी शिकाऱ्याची बाजी शिकाऱ्यावरच उलटवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात श्वानांनी बिबट्याला सरो की पळो करून सोडलं आहे (Dog attack on leopard). श्वानांना पाहून चक्क बिबट्यानेही धूम ठोकली आहे. या श्वानांनी डुकरावर हल्ला करणाऱ्या बिबट्याची पाठ धरली. शेवटी बिबट्याला आपली शिकार सोडून तिथून आपला जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं. डुकराची त्यांनी बिबट्याच्या तावडीतून सुटका केली आहे. @iftirass ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - खाणं द्यायला आलेल्या तरुणालाच सिंहाने जबड्यात धरून फरफटत नेलं आणि…; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य व्हिडीओत पाहू शकता बिबट्याने डुकरावर हल्ला केला आहे. डुकराची मान आपल्या जबड्यात धरली आहे. डुकराला घेऊन तो तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो. पण डुकरही बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत असतो. शिवाय त्याच्या वजनामुळे त्याला सहजपणे उचलून नेणंही बिबट्याला शक्य होत नाही.
— إفتراس | prey (@iftirass) May 5, 2022
इतक्या जंगली श्वानांची नजर या बिबट्यावर पडते. ते बिबट्यावर धावून जातात. त्यांना पाहताच बिबट्या इतका घाबरतो की तो आपली शिकार तिथंच टाकून आधी आपला जीव वाचवण्यासाठी पळतो. तिथून धूम ठोकतो तो थेट झाडावर जाऊन चढतो. बिबट्याला झाडावर चढायला येतं पण जंगली श्वान झाडावर चढू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी तिथूनच माघार घेतली. बिबट्या काही वेळ झाडावरच राहिला. हे वाचा - नशीब बलवत्तर! शार्कने पाय तोंडात पकडला; 8 वर्षांच्या चिमुरड्याने लाथा मारुन मारुन वाचवला स्वत:चा जीव दुसरीकडे बिबट्याच्या तावडीतून सुटलेला ़डुकर एका ठिकाणी दडून बसला. त्याची सुटका करणारे जंगली श्वानही तिथून गेल्यानंतर तो बाहेर पडला आणि त्यानेही तिथून धूम ठोकली. त्यानंतर बिबट्याही झाडावरून खाली उतरला. ज्या दिशेने त्याने जंगली श्वानांना जाताना पाहिलं त्या दिशेने तो दबक्या पावलांनी गेला आणि ते तिथं नाहीत ना याची खात्री करून घेतली. व्हिडीच्या शेवटी जंगली श्वानांनी कुणाची तरी शिकार करून त्यावर त्यावर ताव मारल्याचं दिसतं.