नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : एखादा व्यक्ती आपल्या समोर मुखवटा (Mask) घालून आला, तर आपण त्याला ओळखू शकत नाही. पण एखादा व्यक्ती एका प्राण्यासमोरच मुखवटा घालून गेला तर त्या प्राण्याची रिअॅक्शन काय असेल? प्राण्याची रिअॅक्शन काय असणार? असं वाटू शकतं, पण मुखवटा काढल्यानंतर प्राण्याने दिलेल्या रिअॅक्शनचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) जबरदस्त व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका घोड्यासमोर, घोड्यासारखंच दिसणारं मास्क घातलेलं दिसत आहे. घोड्यासारखाचं मुखवटा घातल्याने, समोर आलेला घोडा त्याला चाटू लागतो. पण तो व्यक्ती जसा तो मुखवटा काढतो आणि त्याचं खरं रूप घोड्याला दिसतं, त्यावेळी घोडा त्या व्यक्तीला पाहून पळू लागतो. घोडा इतका वेगाने पळतो की तो मागे पाहतही नाही. असंच काहीसं ऑनलाईन मैत्री झालेल्या व्यक्तीचं होऊ शकत, अशा आशयाचं कॅप्शनही व्हिडीओला देण्यात आलं आहे.
That moment when you meet the person you befriended online. pic.twitter.com/cSYn1D5tJg
— Praveen Angusamy, IFS 🐾 (@PraveenIFShere) February 18, 2021
हा व्हिडीओ भारतीय वन सेना अधिकारी प्रविण अंगुसामी यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रविण यांनी, '...जेव्हा तुम्ही ऑनलाईन मैत्री झालेल्या व्यक्तीला भेटता' असं मजेशीर कॅप्शनही दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral