डब्बू अंकलनंतर आता साताऱ्यातील सुर्वे काकांचा धुमाकूळ; डान्स VIDEO होतोय तुफान व्हायरल

डब्बू अंकलनंतर आता साताऱ्यातील सुर्वे काकांचा धुमाकूळ; डान्स VIDEO होतोय तुफान व्हायरल

काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर डब्बू अंकलचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सोशल मीडियावर वाईच्या सुर्वे काकांनी (Surve Kaka) धुमाकूळ घातला आहे.

  • Share this:

सातारा, 21 फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वी इंटरनेटर डब्बू अंकलचा डान्स व्हायरल झाला होता. त्यांनी गोविंदाच्या सुपर हिट गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. सध्या सोशल मीडियावर वाईच्या सुर्वे काकांचा (Surve Kaka) एक अफलातून डान्सचा व्हिडिओ (Dance Video) चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओत अमिताभ बच्चनचा प्रसिद्ध 'डॉन' या चित्रपटातील 'खाय के पान बनारसवाला' (khaike paan banaraswala) या व्हिडिओवर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होतं आहे. तर महाराष्ट्रातील अनेकांनी या सुर्वे काकांचा व्हिडिओ वॉट्सअॅप स्टेटसला ठेवला आहे.

सुर्वे काकांचं पूर्व नाव कैलास सुर्वे असून ते सातारा जिल्ह्यातील वाई येथील चित्रा टॉकीजचे मालक आणि आखिल भारतीय मराठी चित्रपट संघाचे प्रसाद सुर्वे यांचे भाऊ आहेत. त्यांनी 78 व्या वर्षी आपल्या मुलीच्या लग्नात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील 'खायके पान  बनारसवाला' या गाण्यावर हुबेहूब डान्स केला आहे

त्यांच्या डान्सचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अगदी युवकांना लाजवेल असा त्यांचा डान्स आहे. कैलास सुर्वे  यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन हा अफलातून डान्स केला आहे. यावेळी त्यांनी या गाण्यावर डान्स करण्याचं एक हृदयस्पर्शी कारणही सांगितंल आहे. खरंतर त्यांनी हे गाणं त्यांच्या स्वर्गीय मित्राला समर्पित केलं आहे. यावेळी त्यांनी  'खाय के पान बनारसवाला' या गाण्यावर डान्स करण्यामागची एक सुखद आठवणही सांगितली आहे.

हे ही वाचा -‘Captain Cool’ चा डान्सिंग अंदाज; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान VIRAL

सुर्वे काकांनी 1979 साली त्यांच्या तारुण्यात असाच डान्स केला होता. त्यांनी वाईतील एका गणेश मंडळाच्या व्यासपीठावर डान्स केला होता. ज्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांचा स्वर्गीय मित्र इनूस बागवान यांनी त्यांचातला हा कला अविष्कार बाहेर काढला होता. यावेळी त्यांनी हा डान्सही त्यांच्या मित्राला समर्पित केला आहे. ही आठवण सांगताना सुर्वे काकांचे डोळ्यात पाणी आलं होतं.

Published by: News18 Desk
First published: February 21, 2021, 4:03 PM IST

ताज्या बातम्या