हत्तीनं उंटासाठी असं काही केलं की, VIDEO पाहून म्हणाल वाह, ही खरी मैत्री!

हत्तीनं उंटासाठी असं काही केलं की, VIDEO पाहून म्हणाल वाह, ही खरी मैत्री!

सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ कायमच व्हायरल होत असतात. हा असाच एक क्युट व्हिडिओ सध्या सगळ्यांना आवडतो आहे.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : प्राणी-पक्ष्यांचे व्हिडिओ (animal videos) सोशल मीडियावर कायमच व्हायरल (video viral on social media) झालेले असतात. कधी कुठला प्राणी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवत असतो, तर कधी काहीतरी कमालीची हुशारी दाखवत एखादी कृती करत असतो. असे व्हिडिओ सर्व वयोगटाच्या लोकांना जगभरात आवडतात.

अनेकदा तर हे व्हिडिओ असे असतात, की या प्राण्यांच्या स्मार्टनेसमुळे व्हिडिओ खरा असल्याच्या गोष्टीवर विश्वासही ठेवणं कठीण होतं. अनेक व्हिडिओ मनाला स्पर्शून जातात, काही डोळ्यात नकळत पाणी आणतात. आता असाच एक अनोखा व्हिडिओ चर्चेत आला आहे. यात आहे एक हत्ती आणि एक उंट (video of elephant and camel). हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळेल की दोन प्राणी एकमेकांचे खूप चांगले मित्र असू शकतात. दोघांचं बॉण्डिंग (bonding) या व्हिडिओत अगदीच स्पष्ट दिसतं आहे.

या व्हिडिओत हत्ती आपल्या सोंडेत पाणी भरून उंटाला मस्तपैकी अंघोळ (offering shower) घालतो आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर केलं आहे. वनअधिकारी सुसांता नंदा यांनी(IFS Officer). आजवर नंदा यांनी अनेकदा असे खास व्हिडिओज शेअर केले आहेत.

हेही वाचाखोल समुद्रात पोहणाऱ्या तरुणीवर शार्कचा हल्ला; भयानक VIDEO कॅमेरात कैद

काही दिवसांपूर्वीच एका सापाला ते स्वतः आपल्या हातातील बॉटलमधून पाणी पाजत होते. हा व्हिडिओ खरोखर अनोखा होता. तो खूप व्हायरलही झाला होता. आता आला आहे उंट आणि हत्तीचा व्हिडिओ. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नंदा लिहितात, 'दोस्ताला फुकटात थेरपी मिळते आहे.' लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडतो आहे. यात हत्ती आधी आपल्या सोंडेत पाणी भरतो. मग तो काही अंतर लांब जातो आणि तिथं उभ्या असलेल्या उंटाला आपल्या सोंडेत पाणी भरून अंघोळ घालतो.

Published by: News18 Desk
First published: February 21, 2021, 8:49 AM IST

ताज्या बातम्या