व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगरावर अतिशय उंचावर बांधलेल्या दोरीवरून चालताना दिसतो. हे दृश्य पाहून कोणाचाही थरकाप उडेल. हा व्यक्ती कोणत्या सुरक्षा उपकरणाशिवाय या दोरीवरुन चालत आहे. तो दोरीवर अतिशय खतरनाक स्टंट करत आहे. शेवटी हा व्यक्ती दोरीवर उभा राहून त्याला पाहाणाऱ्या लोकांचे आभार मानताना दिसत आहे. OMG! उडत्या हेलिकॉप्टरला लटकून तरुणाने...; काळजाचा ठोका चुकवणारा Stunt video सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स हैराण झाले असून यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Stunt video