मराठी बातम्या /बातम्या /Viral /धक्कादायक! गाडीची खिडकी फोडून रस्त्यावर आली 8 फूट मगर आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

धक्कादायक! गाडीची खिडकी फोडून रस्त्यावर आली 8 फूट मगर आणि...; थरकाप उडवणारा VIDEO

अचानक रस्त्यावर गाड्यांसमोर मगर आली आणि सर्वांना घाम फुटला.

अचानक रस्त्यावर गाड्यांसमोर मगर आली आणि सर्वांना घाम फुटला.

अचानक रस्त्यावर गाड्यांसमोर मगर आली आणि सर्वांना घाम फुटला.

वॉशिंग्टन, 25 फेब्रुवारी :   रस्त्यावर गाडी चालवताना किंवा चालताना तुम्हाला एरवी मांजर, कुत्रा दिसतो. पण जरा विचार करा अशावेळी तुमच्यासमोर एखादी भलीमोठी मगर आली तर काय होईल (Crocodile on road). मगर शब्द ऐकूनच अंगावर काटा येतो. अशी मगर रस्त्यावर आली तर अर्धा जीव गेल्यातच जमा. अमेरिकेत अशी मगर खरंच रस्त्यावर आली आहे. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडातील 22 फेब्रुवारीची ही घटना आहे. या मगरीला गाडीतून प्राणीसंग्रहालयात नेलं जात होतं. अचानक ही मगर कारच्या खिडकीतून बाहेर पडली आणि रस्त्यावर आली. त्यानंतर तिला पाहून लोकांना घाम फुटला. आपला जीव वाचवण्यासाठी लोक इथं तिथं पळू लागले.

हे वाचा - दिसतो श्वान पण शरीर बिबट्यासारखं; कोण आहे हा खतरनाक आणि विचित्र प्राणी?

सेंट ऑगस्टीन एलीगेटर फार्म जूलॉजिकल पार्कमधील (St. Augustine Alligator Farm Zoological Park) काही मगरींना  एका व्हॅनमधून नव्या प्राणीसंग्रहायलात नेलं जातं होतं. त्यावेळी एका मगरीने व्हॅनची मागील खिडकी फोडली आणि त्या खिडकीतून ती बाहेर पडली. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावरील डिव्हायडरवर ही मगर आआहे. ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहे. रस्त्यावर गाड्या धावत आहेत. प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वेळाने एक जण मगरीला दोरीने धरतो तर तर दुसरी व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसते. तर तिसरी व्यक्ती या मगरीची शेपटी धरते. एका वाहनचालकाने आपल्या कॅमेऱ्यात हे सर्व दृश्य कैद केलं.

हे वाचा - OMG! उडत्या हेलिकॉप्टरला लटकून तरुणाने...; काळजाचा ठोका चुकवणारा Stunt video

जवळपास 70 किलो वजनाची ही मगर आहे. प्राणीसंग्रहालयाने हा व्हिडीओ पोस्ट करताना दिलेल्या माहितीनुसार या मगरीला लगेच पकडलं आणि सुरक्षितरित्या नव्या प्राणीसंग्रहालयात पोहोचवण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal