जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! उडत्या हेलिकॉप्टरला लटकून तरुणाचं Pull ups; World record साठी खतरनाक Stunt video

OMG! उडत्या हेलिकॉप्टरला लटकून तरुणाचं Pull ups; World record साठी खतरनाक Stunt video

OMG! उडत्या हेलिकॉप्टरला लटकून तरुणाचं Pull ups; World record साठी खतरनाक Stunt video

Pull ups on helicopter world record : तरुणाने हेलिकॉप्टरला लटकून सर्वाधिक पुलअप करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी :  आपण प्रसिद्ध व्हावं, असं कुणाला वाटत नाही. त्यासाठी लोक काय काय नाही करत. आपल्यातील कौशल्य जगासमोर अशापद्धतीने आणतात की पाहणाऱ्यालाच धडकी भरते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणाने चक्क उडत्या हेलिकॉप्टरला लटकून एक्सरसाइझ केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. सध्या लोकांना फिटनेसचं महत्त्व समजलं आहे. त्यामुळे लोक वेळ मिळेल तसा आणि जिथं शक्य तिथं थोडीफार का होईना एक्सरसाइझ करतात कुणी घरात, कुणी बाहेर तर कुणी जीममध्ये एक्सरसाइझ करतं. मग यासाठी एक्सरसाइझ मशीन, भिंत-टेबल-खुर्ची अशा घरातील वस्तू किंवा घराबाहेर झाडाचीही मदत घेतली जाते. पण एका तरुणाने मात्र हवेत उडत्या हेलिकॉप्टरच्या मदतीने एक्सरसाइझ केली आहे. हे वाचा -  VIDEO - गाणं ऐकताच चढला इतका जोश की सर्वांसमोरच व्यक्तीने केलं शॉकिंग कृत्य रोमन सारडिन असं या तरुणाचं नाव आहे. तो अर्मेनियातील राहणारा आहे. त्याने उडत्या हेलिकॉप्टरला लटकून पुलअप केले आहेत. अशापद्धतीने सर्वाधिक पुलअप करण्याचा त्याने विश्वविक्रम केला आहे. त्याच्या या कौशल्याची गिनीज बुकने नोंद घेतली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता हा तरुण हेलिकॉप्टर जेव्हा उडू लागतं, तेव्हा त्याच्या लँडिंग स्लाइडला पकडतो. दोन्ही हात धरून तो पुलअप मारतो. रोमनने एका मिनिटात एका हेलिकॉप्टरला लटकून 23 पुलअप करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हे वाचा -  कांगारूने लाथेने उडवलं आणि…; श्वानांना वाचवताना तरुणाचं काय झालं पाहा VIDEO गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार रोमनने हा रेकॉर्ड गेल्या वर्षी ऑक्टोबरला अर्मेनियातील येरेवनमध्ये केला होता. त्याने असे बरेच रेकॉर्ड्स केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात