मुंबई, 28 एप्रिल : लग्न झाल्यानंतर नवरी आपलं माहेर सोडून सासरी जात असते (Wedding video). त्यामुळे ती थोडी इमोशनल झालेली असते. काही क्षण का होईना तिच्या डोळ्यात पाणी येतंच. काही नवरी तर ढसाढसा रडताना दिसतात (Bride Groom video). पण कधी असं तुम्ही नवरदेवाला असं ढसाढसा रडताना पाहिलं आहे का? अशाच एका रडणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Groom crying Video). सोशल मीडियावर तसे इमोशनल नवरा-नवरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यात एकमेकांना पाहिल्यानंतर नवरा-नवरी रडताना दिसतात. आपण ज्याच्यावर प्रेम केलं तोच आता आपल्या आयुष्याचा जोडीदार होणार, हे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना पाहून त्यांना अश्रू अनावर होत नाही. डोळ्यातून पाण्याच्या रुपाने त्यांच्या भावना व्यक्त होतात. अशा वेळी नवरीच नाही तर नवरदेवही रडताना दिसतात. पण हा व्हिडीओ या व्हिडीओपेक्षा थोडा वेगळा आहे. हे वाचा - बोंबला! Fictional character च्या प्रेमात पडला, लग्नही केलं; पण आता झाला भलताच वांदा व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला नवरदेव डोळ्यांवर हात घेतलेला दिसतो. तो रडतो आहे. रडता रडता तो नाक शिंकरताना दिसतो आहे. त्याची नवरी त्याच्या शेजारीच आहे. नवरदेवाला असं रडताना पाहून तीसुद्धा हैराण होते. एकंदर वातावरण पाहता हा नवरीच्या पाठवणीचा क्षण आहे असं दिसतं. यावेळी नवरीबाईऐवजी नवरदेवालाच रडू कोसळलं.
व्हिडीओ नीट पाहिला तर नवरदेवाच्या डोळ्यात तसं पाणी दिसत नाही आहे आणि मध्येच तो हसतोही. नवरी आणि त्याच्या आजूबाजूला असलेले पाहुणे हसताना दिसताता. तो खरोखर रडत नव्हता. तर रडण्याचं नाटक करत होता.