जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नोकरी गेल्यावर महिलेनं घरबसल्या ऑनलाईन सुरू केला हा व्यवसाय; वर्षभरात कमावले लाखो रूपये

नोकरी गेल्यावर महिलेनं घरबसल्या ऑनलाईन सुरू केला हा व्यवसाय; वर्षभरात कमावले लाखो रूपये

नोकरी गेल्यावर महिलेनं घरबसल्या ऑनलाईन सुरू केला हा व्यवसाय; वर्षभरात कमावले लाखो रूपये

40 वर्षीय मेगन कानटास एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट होती. तिला अनेकदा अमेरिकेला जावं लागायचं. प्रवासादरम्यान ती खूप खरेदीही करायची. परंतु मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान, तिची नोकरी गेली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 एप्रिल : तुम्ही छोट्या शहरातून असाल, तर तुम्हाला कपडे विकून भांडी किंवा कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा व्यवसाय माहीत असेलच. अनेकदा घरी भांडी विकणारे लोक येतात, जे जुने कपडे घेऊन त्याबदल्यात भांडी देतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की एखाद्या व्यक्तीने जुने कपडे विकून लाखो रुपये कमवायला सुरुवात केली आहे? जुने कपडे विकून पैसे कमावणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन महिलेसोबत असाच प्रकार घडला आहे. तिने साइड बिझनेसच्या नावाखाली विचित्र काम सुरू केलं होतं पण आता तिने लाखो रुपये कमवायला सुरुवात केली आहे (Woman Earned 10 Lakh by selling used Clothes). द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील 40 वर्षीय मेगन कानटास एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट होती. तिला अनेकदा अमेरिकेला जावं लागायचं. प्रवासादरम्यान ती खूप खरेदीही करायची. परंतु मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान, तिची नोकरी गेली आणि तिच्याकडे काही कामही नव्हतं. त्या काळात तिच्या वॉर्डरोबमध्ये अनेक कपडे, शूज आणि इतर सजावटीचं सामान होतं, जे तिने कधीही घातलंही नव्हतं. OMG! एका व्यक्तीने 24 तासात 39 लाख रुपयांची वीज वापरली? बिल पाहूनच तरुणाला बसला धक्का तिने सुपरमार्केटमध्ये पार्टटाईम नोकरी सुरू केली होती. मात्र तिला एक मुलगीही आहे आणि या पैशात तिच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यानंतर तिने पॉशमार्क नावाच्या ई-कॉमर्स साइटवर साइड बिझनेस सुरू केला. या साइटवर वापरकर्ते वापरलेले कपडे आणि उपकरणे विकू आणि खरेदी करू शकतात. मेगनने हा व्यवसाय सुरू केला पण तो तिला लखपती बनवेल, याची तिला कल्पनाही नव्हती. रिपोर्टनुसार, मेगनने पहिल्यांदा तिचे शूज 13 हजार रुपयांना विकले, तिने शूजच्या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त दराने हे शूज विकले. ही साइट कशी काम करते हे मेगनला समजल्यावर तिने चॅरिटी शॉप आणि छोट्या दुकानांवर नजर ठेवायला सुरुवात केली आणि त्या दुकानांमधून वस्तूंची खरेदी-विक्री सुरू केली. 100-150 रुपयांची कोणतीही वस्तू ती विकत घेते आणि 4 हजार रुपयांपर्यंत विकते, असं तिने सांगितलं. ‘फोन, लहान मुलं बॅन आणि…’, पाहुण्यांसाठी नवरीच्या विचित्र अटी; वाचून म्हणाल, ‘असं लग्न नको गं बाई’ वेबसाइट फी म्हणून काही पैसे घेते, पण मेगनला या व्यवसायातून भरपूर नफा झाला आहे. आतापर्यंत तिने वेबसाइटवर 362 वस्तू विकल्या आहेत आणि केवळ 1 वर्षात सुमारे 10 लाख रुपये कमावले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या 6 वर्षांच्या मुलीची काळजी घेत तिने आठवड्यातून केवळ 4 तास काम करून ही कमाई केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात