नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यापासून डिजिटल पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये वाढ झाली आहे. यादरम्यान बहुतेक लोक झूम अॅपचा ऑनलाईन मीटिंगसाठी वापर करतात. मात्र अनेकदा झूम मीटिंगदरम्यानच लोक अशा काही चुका करतात की हा चर्चेचा विषय ठरतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात अनेक व्यक्ती झूम मीटिंगमध्ये असल्याचं दिसतं. इतक्यात अचानक एक व्यक्ती आपले कपडे काढतो आणि खोलीत फिरू लागतो (Man Undress During Online Zoom Meeting). मीटिंगमध्ये उपस्थित असलेले इतर लोक हे पाहून हैराण होतात. हा व्हिडिओ अमेरिकेच्या मियामी बीच चेंबर ऑफ कॉमर्समधील (Miami Beach Chamber of Commerce) एका मीटिंगचा आहे. VIDEO : मगर समोर येताच महिलेनं काढली पायातली चप्पल अन्…; पाहा पुढे काय झालं ही मीटिंग फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम (Facebook Live Stream) केली गेली होती. यामुळे इतर लोकही ही मीटिंग पाहू शकत होते. मात्र मीटिंग सुरू असतानाच यात असं काही दिसलं की काही वेळातच याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती काही वेळ मीटिंगमध्ये अॅक्टिव्ह राहतो आणि नंतर अचानक तो आपले कपडे काढतो. यानंतर तो घरातच फिरू लागतो. कदाचित या व्यक्तीला हे समजलंच नाही की तो कॅमेरा बंद करायला विसरला आहे. काहीवेळ रूममध्ये फिरल्यानंतर हा व्यक्ती त्याच अवस्थेत खुर्चीवर येऊन बसतो. कॉलवर उपस्थित असलेले इतर लोक या व्यक्तीला पाहून हैराण होतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Miami Beach man appears to disrobe and walk around naked during this morning’s @MiamiBeachBiz Chamber of Commerce Zoom meeting to discuss, among other things, “negativity of social media” as it relates to the city’s public image. #BecauseMiami pic.twitter.com/KyIbXCwRZ9
— Because Miami (@BecauseMiami) November 9, 2021
झूम मीटिंगमधील असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Zoom Call Weird Videos) झाल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेक हैराण करणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. VIDEO : 140 रुपये खर्चून तरुणीनं खाल्ला हा पदार्थ; हावभाव पाहून खळखळून हसाल एका व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा झूमवर क्लास अटेंड करत होता, इतक्यात त्याची आई कपडे न घालताच मागे येऊन उभा राहिली. इतकंच नाही तर काही व्हिडिओ यापेक्षाही विचित्र असतात. यावरुनच हेच समजतं की झूम मीटिंगमध्ये असताना लोकांनी किती खबरदारी घेणं गरजेचं आहे.