• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : 140 रुपये खर्चून तरुणीनं पहिल्यांदाच खाल्ला हा पदार्थ; हावभाव पाहून खळखळून हसाल

VIDEO : 140 रुपये खर्चून तरुणीनं पहिल्यांदाच खाल्ला हा पदार्थ; हावभाव पाहून खळखळून हसाल

एका तरुणीनं आपल्या आयुष्यात पहिल्यांदा रसगुल्ला टिक्की चाट खाल्ला. पहिला घास तोंडात जाताच तिची जी अवस्था झाली ती सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : अनेकदा आपण बाहेर काहीतरी खाण्यासाठी जातो तेव्हा प्लेटमधील पदार्थ अतिशय आकर्षक दिसतो. मात्र जेव्हा आपण त्याची चव चाखतो तेव्हा तो अतिशय वेगळाच लागतो. एका तरुणीसोबतही असंच झालं, जेव्हा तिनं आपल्या आयुष्यात पहिल्यांदा रसगुल्ला टिक्की चाट खाल्ला. पहिला घास तोंडात जाताच तिची जी अवस्था झाली ती सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाली आहे. VIDEO : आणखी एक अजब पदार्थ आला; ब्राउनी पान बनवण्याची पद्धत पाहूनच वैतागले लोक या डिशचं नाव ऐकताच तुम्ही अवाक झाला असाल अशात ही डिश खाऊन काहीच वेळात तरुणी सदम्यात गेली (Reaction after Eating Rasgulla Chat). मजेशीर बाब म्हणजे ही डिश खाण्याआधी ती अतिशय उत्साहाने याकडे बघत होती. मात्र रसगुल्ला टिक्की (Tikki Rasgulla Chat) खाताच तिचा चेहरा एकदम बदलला.
  View this post on Instagram

  A post shared by So Saute (@sooosaute)

  रसगुल्ला चाटचा हा व्हिडिओ फूड ब्लॉगर अंजली धींगरा (Anjali Dhigra) हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये फूड ब्लॉगर टिक्की रसगुल्ला चाटच्या दुकानासमोरच उभा राहते आणि तिच्या हातात असतं चाटचं एक पान सुरुवातीला तर ती अतिशय उत्साहात दिसते. मात्र हे अजब कॉम्बिनेशन तोंडात जाताच तिचे हावभाव बदलतात. प्लेटमध्ये रसगुल्ला टिक्की, दही आणि लाल-हिरव्या चटणीसोबत दिला गेला आहे. तरुणीचे एक्सप्रेशन पाहूनच समजतं की तिचे 140 रुपये वाया गेले आहेत. दानपेटी चोरण्याआधी देवाच्या पाया पडला अन्..; ठाण्यातील चोरीचा अजब VIDEO ही डिश ट्राय केल्यानंतर तरुणीनं दिलेलं अजब एक्सप्रेशन पाहून अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 85 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत म्हटलं की ब्लॉगरच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं की एका बंगालीच्या मनाला खूप दुःख झालं. काहींनी या डिशची तुलना चॉकलेट मॅगीसोबतही केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: