मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पुलावर स्टंट करणं भोवलं; अचानक तोल गेल्यानं गाडीसह धाडकन कोसळला तरुण, VIDEO

पुलावर स्टंट करणं भोवलं; अचानक तोल गेल्यानं गाडीसह धाडकन कोसळला तरुण, VIDEO

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून (Viral Video) तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून (Viral Video) तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून (Viral Video) तुम्हालाही हसू आवरणार नाही.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 12 सप्टेंबर : आजकालच्या तरुणांमध्ये स्टंटबाबत (Stunt) प्रचंड क्रेज पाहायला मिळतं. हे लोक बाईकवरच असे स्टंट (Bike Stunt) करण्याचा प्रयत्न करतात की पाहणारादेखील थक्क होऊन जातो. मात्र, जेव्हा या लोकांचे स्टंट अपयशी ठरतात तेव्हा त्यांना स्वतःलाच मोठा धडा मिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून (Viral Video) तुम्हालाही हसू आवरणार नाही. लोकल येणार तितक्या महिला रुळावर येऊन थांबली, वसई रेल्वे स्थानकावरचा LIVE VIDEO व्हिडिओमध्ये एक मुलगा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात स्वतःच कोसळतो. हा मुलगा बाईक घेऊन एका कमकुवत लाकडी पुलावरुन जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, काही वेळातच त्याला समजतं, की त्याचा हा निर्णय किती चुकीचा होता. व्हायरल व्हिडिओ पाहून असं वाटतं, की मित्रांमध्ये हा पुल क्रॉस करण्यासाठी पैज लागली आहे आणि या मुलानं हे चॅलेंज स्विकारलं आहे. यानंतर तो आपली गाडी घेतो आणि या लाकडी पुलावर गाडी चालवण्यास सुरुवात करतो. मात्र, पुढच्याच क्षणी त्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की पुढच्या वेळी पैज आणि स्टंट दोन्हीही विचार करूनच करेल. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की अशा प्रकारचे स्टंट करण्याआधी आपले इन्शुरन्स पेपर काढून घेतले पाहिजेत. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. बापरे, झोपलेल्या मुलीच्या गळ्यात नागाने विळखा घातला, 2 तास रंगला थरार VIDEO हा व्हिडिओ ट्विटरवर HldMyBeer नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओ शेअर करत याला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. हा मजेशीर व्हिडिओ 12 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकजण हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअरही करत आहेत.
First published:

Tags: Stunt video, Video Viral On Social Media

पुढील बातम्या