नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 11 सप्टेंबर : साप (snake) म्हटल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो. पण, वर्ध्यात (wardha) झोपलेल्या एका मुलीच्या अंथरुनामध्ये नाग आढळून आला. झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर तब्बल दोन तास हा नाग (cobra snake) ठाण मांडून होता. दोन तासानंतर या विषारी सापाने शेवटी त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला. सदर मुलीस सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अंगावर काटा आणणारी ही घटना तालुक्याच्या बोरखेडी(कला) येथे घडली. गावात या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरताच एकच खळबळ उडाली.
बोरखेडी कला येथील पूर्वा पद्माकर गडकरी (purava gadkari) (वय 6 वर्ष) ही तिच्या आईसोबत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जमिनीवर अंथरून टाकून झोपली होती. रात्री 12 च्या सुमारास हा विषारी साप दोघी मायलेकींच्या अंगावर चढला, यात आईला जाग आल्यामुळे ती बाजूला झाली. परंतु, तो साप मुलीच्या गळ्याला विळखा घालून फणा काढून असल्यामुळे तिला स्तब्ध राहण्यास सांगितले, वडिलांनी आजूबाजूला बोलून घेतले.
#वर्धा - झोपलेल्या मुलीजवळ आढळला नाग, दोन तासाच्या थरारानंतर सापाने घेतला चावा pic.twitter.com/YCHPGiDxpO
— News18Lokmat (@News18lokmat) September 11, 2021
तर शेजाऱ्यांनी सर्प मित्राला सुद्धा बोलविले. त्यामुळं मदतीला अनेकांनी धाव घेतली परंतु, कोणताही उपाय चालला नाही. तर बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे त्या सापास धोका वाटल्याने तो सुद्धा जागा सोडण्यास तयार नव्हता. हा थरार तब्बल दोन तास चालला. हा प्रकार बघून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले तर त्या मुलीची अतिशय दयनीय अवस्था झाली होती, शेवटी रात्री 2 च्या सुमारास त्या सापाने मुलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सापाचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दबून असल्याने त्या अतिशय विषारी सापाने अखेर त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला.
ESIS हॉस्पिटल सोलापूर इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर होणार मुलाखत
सर्पमित्र येईपर्यंत हा प्रकार होऊन गेला होता. उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्या मुलीस तातडीने सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात भरती केले. सध्या ती मुलगी सेवाग्राम येथे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. पद्माकर गडकरी यांच्या घरी घडलेला प्रकार मनाला चटका लावणारा तितकाच ठरकाप उडविणारा होता. घडलेल्या प्रकाराची बातमी रात्रीच वाऱ्यासारखी पसरली आणि नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी गडकरी यांच्याघराकडे धाव घेताना दिसत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake