मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोकल येणार तितक्या महिला रुळावर येऊन थांबली, वसई रेल्वे स्थानकावरचा LIVE VIDEO

लोकल येणार तितक्या महिला रुळावर येऊन थांबली, वसई रेल्वे स्थानकावरचा LIVE VIDEO

 रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक लोकल समोरून आली. त्यामुळे त्या रुळाच्या मधोमध उभ्या राहिल्या.

रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक लोकल समोरून आली. त्यामुळे त्या रुळाच्या मधोमध उभ्या राहिल्या.

रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक लोकल समोरून आली. त्यामुळे त्या रुळाच्या मधोमध उभ्या राहिल्या.

वसई, 11 सप्टेंबर : मुंबईत लोकलसमोर (mumbai local) उडी मारून आत्महत्या करण्याची घटना वारंवार घडत असतात. वसई रेल्वे स्थानकावरही (vasai railway station) अशीच थरारक घटना घडली. पण, वेळी पोलिसांनी धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. सुदैवाने मोटरमनने वेळीच लोकल थांबवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार,  वसई रोड रेल्वे स्थानकावर  आज सकाळी 10.01 मिनिटांनी ही घटना घडली.  सुभद्रा सूर्यकांत शिंदे ( वय 60) असं या महिलेचं नाव आहे. त्या मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली.  रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक लोकल समोरून आली. त्यामुळे त्या रुळाच्या मधोमध उभ्या राहिल्या.

त्याचवेळी वसई रेल्वे स्टेशनवर पोलीस हवालदार एकनाथ नाईक ड्युटीवर होते. त्यांनी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर डहाणूवरून अंधेरीला जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती. त्यावेळी या महिलेला उभं असल्याचं पाहिलं.  तेव्हा पोलीस हवालदार अनिल गुजर, प्रवीण थोरात हे ब्रिजवर गस्त घालीत असताना लक्ष गेल्यानंतर त्यांनी एकनाथ नाईक यांना सांगितल्यावर त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता धाव घेतली.

अवघ्या 1 सेकंदात रडणाऱ्या बाळाला करा शांत; ही ट्रिक कधीच होत नाही फेल

घटनास्थळी पोहोचून सुभद्रा शिंदे यांना ताब्यात घेतले.  तात्काळ आरपीएफचे राजेंद्र बडगुजर, संतोष गुजर,सतपाल यांनी मिळून रुळामधून सुभद्रा यांना बाहेर काढले. त्यानंतर विचारपूस केली असता वसईती एकटीच राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सुभद्रा शिंदे यांना आश्रमात पाठवण्यात आले आहे.

First published:

Tags: Vasai