• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: भिंत पाडायला गेला अन् स्वतःचाच पाय मोडून घेतला; अक्षरशः वेदनेनं विव्हळू लागला युवक

VIDEO: भिंत पाडायला गेला अन् स्वतःचाच पाय मोडून घेतला; अक्षरशः वेदनेनं विव्हळू लागला युवक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter Video) शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती पार्कची भिंत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या युवक सतत आपल्या पायानं भितींवर लाथा मारत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 29 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे हैराण करतात तर काही व्हिडिओ (Funny Videos) खळखळून हसवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती असं काही करताना दिसतो की पाहून तुम्हीही म्हणाल, की जे पेरतो तेच उगवतं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. इंग्रजी बोलणाऱ्या कुत्र्याचा VIDEO; मालकिणीला विचारलेला प्रश्न ऐकून सगळेच थक्क सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter Video) शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती पार्कची भिंत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या युवक सतत आपल्या पायानं भितींवर लाथा मारत आहे. काही वेळानंतर ही भिंत तुटते मात्र या व्यक्तीसोबत असं काही घडतं की तो जोरात ओरडतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रागात वारंवार भिंतीवर लाथ मारत आहे आणि ही भिंत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळानंतर ही भिंत तुटते. मात्र, भिंत तुटताच याचा काही भाग त्याच्या पायावर पडतो. यामुळे त्याचा पाय भिंतीच्या मध्ये गुंततो आणि वेदनेनं तो अक्षरशः विव्हळत राहतो. महिलेने Amazon Delivery Boy कडून केली विचित्र मागणी; बिचाऱ्यावर आली ही वेळ! सोशल मीडियावर या व्हिडिओ अनेकांनी पसंती मिळत आहे. अनेकजण यावर मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरनं म्हटलं, की जसे कर्म कराल तसंच फळ मिळेल. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की या व्यक्तीला खूप वेदना झाल्या असतील. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू आलं असेल. हा व्हिडिओ ट्विटरवर ‘@AwardsDarwin’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांनी पाहिला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: