जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इंग्रजी बोलणाऱ्या कुत्र्याचा VIDEO घालतोय धुमाकूळ; मालकिणीला विचारलेला प्रश्न ऐकून सगळेच थक्क

इंग्रजी बोलणाऱ्या कुत्र्याचा VIDEO घालतोय धुमाकूळ; मालकिणीला विचारलेला प्रश्न ऐकून सगळेच थक्क

इंग्रजी बोलणाऱ्या कुत्र्याचा VIDEO घालतोय धुमाकूळ; मालकिणीला विचारलेला प्रश्न ऐकून सगळेच थक्क

सध्या एका कुत्र्याचा (Dog) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. यातला कुत्रा आपल्या मालकिणीला चक्क प्रश्न विचारताना दिसत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 28 ऑगस्ट : कुत्रा आणि मांजरासारखे पाळीव प्राणी (Pets) आपल्या घरातल्या सदस्यांप्रमाणेच असतात. त्यांना जितकं प्रेम द्याल तितकंच तेदेखील प्रतिसाद देतात. कुत्रा हा त्यापैकीच एक प्राणी. इमानदार म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी तितकाच संवेदनशील असतो. तुम्ही त्याचा जितक्या जिव्हाळ्यानं सांभाळ कराल, तितकाच त्याला लळा लागतो. सोशल मीडियावर (Social Media) अनेक युझर्स आपल्या पाळीव प्राण्यांचे विविध व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात. त्यातल्या या प्राण्यांच्या विविध गोष्टी, क्रिया-प्रतिक्रिया नेटिझन्सच्या पसंतीस उतरतात. त्यामुळे अशा प्राण्यांचे फोटो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या असाच एका कुत्र्याचा (Dog Speaking English) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यातला कुत्रा आपल्या मालकिणीला चक्क प्रश्न विचारताना दिसत आहे. या कुत्र्याचं इंग्रजी बोलणं ऐकून नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या व्हिडिओबाबतचं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने दिलं आहे. आपण कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी घराबाहेर निघालो तर घरातली लहान मुलं `तुम्ही कुठं चाललात` असा प्रश्न हमखास विचारतात. त्यात नवीन काही नाही. परंतु, एक अजब व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात चक्क कुत्रा घरातल्या महिलेशी संवाद साधताना दिसत आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कुत्रा बोलू शकतो का? पण या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत आहेत. 7ऑगस्टला Cheekclapper24_7 या अकाउंटवरून हा व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला आहे. महिलेने Amazon Delivery Boy कडून केली विचित्र मागणी; बिचाऱ्यावर आली ही वेळ! या व्हिडिओत एक महिला मोठ्या आरशासमोर उभं राहून आपले कपडे (Outfit) व्यवस्थित करताना दिसत आहे. त्यानंतर तिने कॅमेरा ऑन केला असून, आपल्या लूकवर ती पुन्हा एकदा नजर टाकत असताना घरातला हस्की ब्रीडचा कुत्रा तिच्या जवळ येत तिला `Where are you going?` असा प्रश्न विचारताना दिसत आहे. या कुत्र्याने मालकिणीजवळ येताच सर्वप्रथम तिच्याकडे पाहिलं आणि आपल्या आवाजात हा प्रश्न तिला केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्याचा असा आवाज ऐकून मालकिणीला क्षणभर विश्वास बसला नाही. त्यामुळे तिने तो व्हिडिओ पुन्हा स्लो मोशन (Slow Motion) प्ले करून पाहिला आणि कुत्र्यानेच आपल्याला प्रश्न विचारल्याची तिची खात्री पटली.

    बापरे! थेट सापासोबत भिडला कोंबडा; VIDEO मध्ये पाहा कोणी जिंकली लढाई ‘न्यूज वीक’च्या वृत्तानुसार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online Platform) हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात कुत्रा मालकिणीला प्रश्न विचारत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ या महिलेने टिकटॉकवर (TikTok) पोस्ट केला असला तरी तो आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नेटिझन्सनी या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक युझर आश्चर्य व्यक्त करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात