मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Weird News : महिलेने Amazon Delivery Boy कडून केली विचित्र मागणी; बिचाऱ्यावर आली ही वेळ!

Weird News : महिलेने Amazon Delivery Boy कडून केली विचित्र मागणी; बिचाऱ्यावर आली ही वेळ!

महिलेने केलेली मागणी वाचून तुम्हीही हैराण व्हाल...

महिलेने केलेली मागणी वाचून तुम्हीही हैराण व्हाल...

महिलेने केलेली मागणी वाचून तुम्हीही हैराण व्हाल...

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली: Weird News: कोरोना काळात (Coronavirus) ऑनलाइन खरेदी करण्याच्या प्रमाणात (Online Shopping) वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अनेक लहान-सहान गोष्टींसाठी ऑनलाइन शॉपिंग केलं जातं. Amazon सारख्या संकेत स्थळांवर ग्राहकांसाठी सामानाच्या डिलिव्हरीसाठी खास सूचना (Delivery Instruction) देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांच्या या पॉलिसीचा फायदा घेत एका महिलेने Amazon वर अत्यंत विचित्र विनंती केली. ही रिक्वेस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महिलेला कोळीची वाटत होती भीती

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म टिकटॉक (Tiktok) वर एका महिलेने आपला एक विचित्र अनुभव (Weird News) शेअर केला आहे. जगभरात असे अनेक लोक आहेत जे कोळ्याच्या (Spider) नावाने घाबरतात. या महिलेसोबतदेखील असंच काहीस झालं आहे. या महिलेच्या घराच्या मुख्य दारासमोर कोळ्याने जाळं तयार केलं होतं. त्यामुळे ती घरातून बाहेर यायला घाबरत होती. अशात Gwen Sanchez नावाच्या महिलेने अत्यंत विचित्र पद्धतीचा अवलंब केला. (Woman makes Strange demand from Amazon Delivery Boy)

हे ही वाचा-शर्टाच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक घेतला पेट; CCTV मध्ये कैद झाला VIDEO

Amazon वर ठेवली विचित्र मागणी

Amazon किंवा कोणत्याही ऑनलाइन सामानाची ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी बॉयसाठी काही खास सूचना दिल्या जाऊ शकतात. तुम्ही त्याला सांगू शकता की, सामान कोणत्या वेळात आणायचं आणि कुठे ठेवायचं. अशाच महिलेने रिक्वेस्ट बॉक्समध्ये लिहिलं हीक, पॅकेज गॅरेजसमोरील कचऱ्याच्या डब्यासमोर ठेवून द्या. माझ्या घराच्या दारासमोर एक मोठा कोळी आहे. जर तुम्ही त्याला मारलं तर खूप बरं होईल. कोळीच्या भीतीमुळे मी घराबाहेर पडू शकत नाहीये. तुमचे आभार.

डिलिव्हरी बॉयने (Amazon Delivery Boy) महिलेची अडचण लक्षात घेत आपल्या शूजने कोळीला मारलं. टिकटॉकवर (Tiktok) ही घटना शेअर झाल्यानंतर खूप व्हायरल होत आहे. लोक महिलेला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे की, तिने  Amazon ची प्राइम (Amazon Prime) नव्हे तर प्रीमियम मेंबरशिप (Premium Membership) घेतली आहे..

First published:

Tags: Amazon, Viral news