• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! युवकानं नवरी-नवरदेवाला वरती उचललं अन् धाडकन जमिनीवर आपटलं, पाहा विचित्र VIDEO

OMG! युवकानं नवरी-नवरदेवाला वरती उचललं अन् धाडकन जमिनीवर आपटलं, पाहा विचित्र VIDEO

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) झाला आहे. यात एक व्यक्ती नवरदेव आणि नवरीला वरती उचलतो आणि पाहुण्यांसमोरच जमिनीवर आपटतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : देशभरात वेगवेगळ्या भागानुसार लग्नात (Indian Wedding Rituals) वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात. अनेकदा अशा काही प्रथा पाहायला मिळतात, ज्या बहुतेकांना माहिती नसतात. काही ठिकाणी नवरदेव आणि नवरीशिवाय (Groom and Bride) इतर पाहुणेही या प्रथांचं पालन करत वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) झाला आहे. यात एक व्यक्ती नवरदेव आणि नवरीला वरती उचलतो आणि पाहुण्यांसमोरच जमिनीवर आपटतो. रुसलेल्या नवरदेवाचे स्टेजवर भलतेच नखरे; लग्नाच्या दिवशीच नवरीचा हिरमोड, Video लग्नातील ही अजब परंपरा पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नानंतर नवरी आणि नवरदेव पाहुण्यांपुढे उभा राहतात. इतक्यात त्यांचाच नातेवाईक असलेला एक व्यक्ती मागून येतो आणि या दोघांनाही पकडतो. यानंतर तिथे उपस्थित पाहुणे हूटिंग करू लागतात. हा व्यक्ती नवरी आणि नवरदेवाला उचलतो. त्यांना हवेत वरती घेऊन सोडून देतो. यानंतर नवरी आणि नवरदेव धाडकन जमिनीवर आदळतात.
  नवरी जेव्हा हवेत असते तेव्हा आपल्या हातातील तांदूळ ती मागे फेकते. हे पाहून हे समजतं, की ही लग्नातील एक परंपरा आहे. व्हिडिओ पाहून हे समजतं, की नवरदेव आणि नवरीला उचलून जमिनीवर आदळलं गेलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. फ्लाईटमध्येच एअर होस्टेसचा जबरदस्त डान्स; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Reels) निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवरुन अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर, अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: