नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : माणूस भरपूर विचार करून आपल्या शरीरावर टॅटू
(Tattoo on Body) गोंदवतो. टॅटू अगदी आयुष्यभर माणसाच्या शरीरावर कायम राहतो. त्यामुळे कोणताही व्यक्ती अतिशय विचारपूर्वक टॅटू गोंदवतो. याची डिझाईन आणि स्पेलिंग याबाबत लोक विशेष काळजी घेतात. कारण यात काही चूक झाल्यावर आयुष्यभर ती सहन करावी लागते. सोशल मीडियावर
(Social Media) एक व्यक्तीनं आपल्यासोबत झालेल्या अशाच टॅटू ब्लंडरचा फोटो
(Tattoo Blunder Photo) शेअर केला आहे. या व्यक्तीनं आपल्या मांडीवर हत्तीचा क्यूट टॅटू काढला होता. मात्र, यात लोकांना काही अश्लिलता दिसेल याचा त्यानं स्वप्नातही विचार केला नव्हता.
मॉडेलचं ऑक्सिजन सिलेंडरसोबत बोल्ड फोटोशूट; लूक व्हायरल होताच भडकले लोक
व्यक्तीनं हाफ पॅन्ट घालून आपल्या या टॅटूचा फोटो शेअर केला आहे. मात्र, जेव्हा लोकांनी त्याचा फोटो पाहिला तेव्हा सगळेच हैराण झाले. या व्यक्तीच्या टॅटूचा फोटो रेडिटवर शेअर झाला. लोकांना या फोटोमध्ये भयंकर ब्लंडर दिसलं. त्यानं आपल्या मांडीवर एका हत्तीचा चेहरा गोंदवून घेतला होता. मात्र, पहिल्या नजरेत हा टॅटू माणसाच्या गुप्तांगाप्रमाणे दिसत होता. या व्यक्तीनं सांगितलं, की जेव्हा लोकांनी त्याच्या टॅटूवर अशा कमेंट करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यालाही यात अश्लीलता दिसली.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच हसू आलं. एका व्यक्तीनं लिहिलं, की तो देवाकडे प्रार्थना करत आहे, की हा टॅटू नकली असावा. तर, आणखी एकानं लिहिलं की टॅटूसोबत हाफ पॅन्ट घालणं वेडेपणा आहे. हा पाहतानाच अतिशय अश्लील दिसत आहे. तर आणखी एकानं लिहिलं, एकतर या टॅटूमध्ये काहीतरी चूक आहे, किंवा मग माझं डोकं खराब झालं आहे. अनेकांनी या टॅटूचं कौतुकही केलं आहे.
डेटसाठी गेली पण...; प्रियकराने तरुणीची केली वाईट अवस्था, थेट रुग्णालयातच पोहोचली
सोशल मीडियावर अशा टॅटू मिस्टेकचे अनेक फोटो शेअर केले जातात. काही दिवसांपूर्वी एका महिलेनंही आपल्या फ्लोरल टॅटूचा फोटो शेअर केला होता. तोदेखील अशाच काही कारणांमुळे व्हायरल झाला होता. महिलेनं आपल्या शरीरावर फुलाचा टॅटू काढला होता. हा लोकांना अश्लील वाटला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.